ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे त्यांच्या बेधडक वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. आता देखील संजय राऊत यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे ते चर्चेत आले आहेत. देशातील प्रमुख नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या संपर्कात असल्याचे वक्तव्य संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केलं आहे.
जिओचे हे ‘स्वस्त आणि मस्त’ रिचार्ज प्लॅन तुम्हाला माहीतच असायला हवेत; वाचा सविस्तर
त्याचबरोबर आम्ही हळूहळू 2024 ची तयारी सुरु केली आहे. असं देखील यावेळी संजय राऊत म्हणाले आहेत. काल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) आणि उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर बैठक झाली. यावेळी राष्ट्रीय राजकारणावर प्रदीर्घ चर्चा केल्याची माहिती देखील संजय राऊतांनी दिली. ते आज सकाळी माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
धनुष महिन्याला कमावतो ‘इतके’ कोटी रुपये, वाचा त्याच्या संपत्तीविषयी सविस्तर माहिती
काल (दि.25) आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल ( Arvind Kejriwal) व पंजाबचे मुख्यमंत्री भागवत मान यांनी उद्धव ठाकरेंची ( Uddhav Thackeray) भेट घेतली. ‘मातोश्री’वर ही बैठक पार पडली. या दोन्ही नेत्यांमध्ये राष्ट्रीय राजकारणावर चर्चा झाल्याची माहिती राऊतांनी दिली. या चर्चेत काही भूमिका ठरवल्या आहेत. आणि त्या चर्चा काही दिवसांनी समोर येतील असं देखील यावेळी संजय राऊत म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
राखी सावंतने केला धक्कदायक खुलासा; म्हणाली, “आदिल खान बायसेक्शुअल, त्याचा न्यूड व्हिडीओ…” पाहा VIDEO