हिरडगावमध्ये खासदार डॉ.सुजय दादा विखे पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामांचा भूमिपूजन व उद्घाटन समारंभ पार पडला

हिरडगाव : दि. १७ हिरडगाव येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माननीय खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.मंत्री आमदार श्री बबनरावजी पाचपुते हे उपस्थित होते.

धक्कादायक घटना! दौंडमध्ये घरफोडून १० लाख ७२ हजारांसह दागिने लंपास

यावेळी केंद्र सरकार व महाराष्ट्र शासन जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा योजनेसाठी (रक्कम १८९. ११लाख) उपलब्ध झाला असून त्याचा भूमिपूज व स्थानिक विकास कार्यक्रम खासदार निधी अंतर्गत श्री नागनाथ मंदिर येथील रस्ता काँक्रिटीकरण (रक्कम 10 लाख) उद्घाटन समारंभ खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील यांच्या हस्ते पार पडला.

मोठी बातमी! जिल्हा परिषदेच्या २८७ शाळा बंद होण्‍याच्‍या मार्गावर? राज्य सरकारने घेतला निर्णय

या प्रसंगी हिरडगाव ग्रामस्थांच्या वतीने कुकडी कालव्याच्या उन्हाळी आवर्तनासंदर्भात व शेतीचा वीजपुरवठा सुरळीतपणे व्हावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील यांनी जिल्हा नियोजन मंडळात याबद्दल आराखडा तयार करून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्फत हा प्रश्न सोडवण्यात येईल असे आश्वासन दिले.

वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या जेवणात निघाल्या आळ्या, परिसरात उडाली खळबळ

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.मिलींद दरेकर यांनी केले, प्रास्तविक श्री.गंगाराम दरेकर यांनी केले व श्री.संतोष दरेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी श्री.केशवराव मगर, श्री.भगवानराव पाचपुते, श्री.दत्ता पानसरे, श्री.अजित जामदार, सौ.सुवर्णा पाचपुते, सौ.प्रतिभा झिटे तसेच हिरडगावचे सरपंच सौ.सुनीता दरेकर, उपसरपंच श्री.योगेश दरेकर तसेच हिरडगावमधील ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

दिवाळीनिमित्त भारतीयांसाठी इंस्टाग्रामची खास ऑफर, रील्स बनवा अन्…; पाहा नेमकी काय आहे ऑफर?

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *