राज्य सरकारने दूध मापनाबद्दल नुकताच एक मोठा निर्णय घेतला. यामध्ये दूध संकलन केंद्रावर 10 ग्रॅम अचुकतेचे इलेक्ट्रॉनिक वजन काटे असणे बंधनकारक केले आहे. यामुळे दुधाच्या वजनात अचूकता येऊन शेतकऱ्यांच्या दुधाच्या ( Milk) थेंबालाही किंमत मिळणार आहे. परंतु, या दुधाच्या थेंबाची खरी किंमत तुम्हाला माहित आहे का? वेगवेगळ्या देशात दुधाचे वेगवेगळे दर असतात. भारतात दूध 50 रुपये लिटर या दराने मिळते तर आपल्या आजूबाजूच्या देशात याच्या वेगळ्या किंमती आहेत. Milk rates in different countries)
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! उरलेले आमदारही फुटणार?
आपल्या शेजारील पाकिस्तान या देशात दुधाची किंमत भारतापेक्षा तीन पटीने जास्त आहे. येथे एक लिटर दुधासाठी 170 रुपये मोजावे लागतात. बांग्लादेशात दुधाची किंमत पाकिस्तान एवढी जास्त नाहीय. आर्थिक सुब्बतेमुळे बांग्लादेशमध्ये 60 रुपये प्रति लिटर दराने दूध विकले जाते. नेपाळचे चलन हे डॉलरपेक्षा फारच कमकुवत आहेत. त्यामुळे येथे देखील दुधाच्या दरात तफावत आढळते. नेपाळमध्ये 80 ते 90 लिटर दराने दूध विकले जाते. चीनमध्ये दुधाची किंमत 1:39 डॉलर म्हणजेच 114 रुपये प्रति लिटर आहे.
आजपासून बाईक टॅक्सीविरोधात रिक्षाचालकांचे आंदोलन
प्रत्येक देशात दुधाच्या किंमती कमी अधिक आहेत. तरीही जगभरात दुधाला पसंती आहे. कारण दूध हे शरीरासाठी चांगले असते. नियमित दूध पिल्याने प्रतिकारशक्ती शक्ती (Resistance Power) वाढते. यामुळे दुधाचा फायदा होतो. तसेच दुग्धजन्य पदार्थ देखील शरीरासाठी पोषक असतात. दुधात शरीरासाठी आवश्यक अन्नघटक मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे कितीही महाग असले तरी लोक दूधाचे सेवन करतातच.