श्रीगोंदा: कोरोना नंतर आता लंम्पीने देशासह राज्यभरात धुमाकूळ घातला आहे. यामध्येच अहमदनगर जिल्ह्यात 8 हजार 58 जनावरांना लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील ४१८ जनावरे दगावली आहेत.
मोठी बातमी! नरेंद्र मोदींच्या जीवाला धोका, ‘या’ दहशतवादी संघटनेच्या टार्गेटवर
माहितीनुसार, अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातून या आजाराचे पहिले जनावर सापडले होते. नंतर हा आजार संपूर्ण जिल्ह्यात पसरला. आतापर्यंत जिल्ह्यातील 215 गावांत 8 हजार 58 जनावरे लंम्पीने बाधित झाली. या आजाराने बाधित जनावर आढळून आल्यास पाच किलोमीटर पर्यंत अलर्ट जारी केला जातो त्यानुसार नगर जिल्ह्यात 1109 गावांत अलर्ट जाहीर केला केलाय.
राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय! एसटी कर्मचाऱ्यांचा बोनस केला डबल
यामध्येच श्रीगोंद्यात ११२५ जनावरांना लंम्पी झाला असून त्यामधील २६ जनावर दगावली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सर्वाधिक प्रादुर्भाव कर्जत तालुक्यात असून, जनावरांच्या मृत्यूचे प्रमाण देखील कर्जत तालुक्यात जास्तच आहे.