पुणे : आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji sawant) हे नेहमी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून चर्चेत असतात. मागील आठवड्यात तानाजी सावंत आपल्या धावत्या दौऱ्यावरून चांगलेच ट्रोल झाले आहे. सावंत यांच्या पुणे (pune)दौऱ्यात तीन दिवस घर ते खाजगी कार्यालयाला जाण्याची माहिती दिल्याने चांगलेच ट्रोल झाले. दरम्यान आता तानाजी सावंत पुण्यातील ससून रुग्णायात (sasun hospital) ऍक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून आले. त्यांनी ससून रुग्णायातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना खडसावत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. तानाजी सावंत यांनी स्वतःच आपल्या फेसबुक अकाउंटवर तीन व्हिडीओ शेअर केले आहेत
नेमक प्रकरण काय आहे
सोलापूर (solapur) जिल्ह्यातील ताक मोहोळ येथील एक तरुण रोगामुळे त्रस्त असून तो उपचार घेण्यासाठी ससून रुग्णालयात गेला. दरम्यान रुग्णालयात तरुणाला त्याच्या रोगाशी संबंधित डॉक्टर काही दिवस नाही अस सांगण्यात आल. दरम्यान या तरुणाने आणि त्याच्या नातेवाईकांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे धाव घेऊन सगळ प्रकरण सांगितल. दरम्यान तानाजी सावंत यांनी तरुणाला घेऊन तातडीने ससून रुग्णालय गाठले. नाराज तानाजी सावंत यांनी तरुणाला उपचारासाठी प्रतिसाद का दिला गेला नाही, असा जाब विचारला. आणि लगेच त्या तरुणाला दाखल करायला लावलं.
तानाजी सावंत ऍक्शन मोडमध्ये?
तानाजी सावंत यांनी आपल्या फेसबुकवरून पोस्ट करून माहिती दिली की. त्यांनी यावेळी रूग्णालयात कोणत्याही रूग्णांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये. तसेच लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून दर्जेदार आरोग्य सेवा वेळेवर पोहोचविण्यास प्राधान्य द्यावे, अशा सूचना यावेळी दिल्या.तसेच जनतेच्या सेवेसाठी वैद्यकीय मदत अतिशय तत्पर असणे आवश्यक असते याचं भान सर्वांनी राखणं गरजेज आहे अस देखील तानाजी सावंत म्हणाले.
Amol Mitkari: शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार – अमोल मिटकरी
.