सध्या बरेच लोक आपल्याला बसने प्रवास करताना दिसतात. कमी खर्चामध्ये बसने आपण कुठेही फिरू शकतो. बसचा प्रवास हा एकदम सुखकर असतो. त्यामुळे बरेचजण बसने प्रवास करतात. दैनंदिन जीवनात देखील भरपूर लोक बसने प्रवास करतात. त्यामुळे बसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळते. (Viral Video )
बसमध्ये एवढी गर्दी असते की, बसायचं तर सोडाच लोकांना साधं उभं रहायला देखील जागा मिळत नाही. त्यामुळे बसमध्ये जागेवरून नेहमीच वाद झालेला पाहायला मिळतो. बसमधील भांडणाचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या देखील असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ कर्नाटकमधील म्हैसूर मधला असल्याचे बोलले जात आहे. (Latest Marathi News)
या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोन महिला एका सीटवरून भांडल्याचे दिसत आहे. म्हैसूरहून चामुंडी हिल्सकडे जाणाऱ्या बसमध्ये ही घटना घडली. बसमध्ये खूप गर्दी होती. यामध्ये त्यात एक सीट रिकामी होती. त्या सीटला एका महिलेने स्कार्फ गुंडाळले होते. आणि त्या सीटवर दुसरीच महिला तिथे जाऊन बसली. आणि यावेळी ज्या महिलेने स्कार्फ ठेवले होते त्या महिलेने दुसऱ्या महिलेला उठायला लावले.
आनंदाची बातमी! पुढील 72 तास पावसाचे, पाहा एका क्लीकवर तुमच्या जिल्याचे अपडेट्स
यावेळी महिलेने सीटवरून उठण्यास नकार दिला. यावेळी त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली आणि यानंतर याचे रूपांतर हाणामारीमध्ये झाले. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओवर नेटकरी देखील वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडीओ @ssaratht नावाच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.
ब्रेकिंग! खासदार उदयनराजे यांच्यावर गुन्हा दाखल, शिवेंद्रराजेंविरुध्दचा ‘तो’ राडा चांगलाच भोवला
Fights erupting in Mysore, Karnataka’s free bus service scheme. pic.twitter.com/4ugFTuK039
— Tathvam-asi (@ssaratht) June 20, 2023