राजगडाच्या पायथ्याशी MPSC च्या परीक्षेत राज्यात तिसऱ्या आलेल्या दर्शना पवार (Darshana Pawar) हिचा मृतदेह अर्धवट कुजलेल्या स्थितीत 18 जून रोजी आढळून आला होता. दर्शनाची हत्या तिचा मित्र राहुल हंडोरे याने केली असावी असा पोलिसांकडून प्राथमिक अंदाज बांधला जात होता. कारण दर्शनाची हत्या झाल्यापासून राहुल गायब झाला होता. पोलिसांनी आपली सूत्रे कामाला लावत राहुलचा शोध घेतला. पाच दिवसांनंतर पोलिसांनी त्याला मुंबईतून (Rahul Handore Arrested) अटक केली. (Latest Marathi News)
सध्या याबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी फरार झालेल्या आरोपी राहुलला शिताफिने आपल्या जाळ्यात ओढलं. यासाठी त्यांनी त्याला पैसे देखील पुरवल्याची माहिती समोर आली आहे. राहुल चार पाच दिवस गायब होता. त्यामुळे त्याला शोधणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. त्यामुळे पोलिसांनी अनोखी शक्कल लढवली.
Gautam Adani । अदानी साम्राज्याला पुन्हा धक्का! चौकशी सुरु होताच ५२ हजार कोटी गेले पाण्यात
पोलिसांनी आरोपी राहुलच लोकेशन ट्रेस केलं आणि त्याच्याच नातेवाईकांचा मोबाईल घेऊन त्याच्याशी संपर्क साधलेला. संपर्क साधल्यावर त्याला पैशांची गरज आहे का असं विचारलं. आणि पोलिसांनी त्याला काही पैसेही पाठवले व त्याच्या सर्व हालचालींवर लक्ष ठेवलं. त्यानंतर तो कुठे जातोय, कुठे राहतोय या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवले. आणि अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला आणि त्याला अटक करण्यात आली.