सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. सर्वसामान्यांपासून ते मोठं-मोठ्या सेलिब्रेटींपर्यंत अनेकजण बोहल्यावर चढत आहेत. त्यामुळे त्याच्याशी निगडित अनेक बातम्या समोर येत आहे. अशाच एका लग्नाची चर्चा सर्वत्र सुरु आहे. 7 दिवसांपूर्वी लग्न झालेली एक नववधू तिच्या प्रियकरासोबत पळून गेली आहे. ही घटना घडली आहे उत्तर प्रदेशमधील बांदा येथे.
’50 खोके आणि 105 डोके’ नांदेडमध्ये रंगले पुन्हा बॅनरवॉर
31 मे रोजी या मुलीचे लग्न झाले होते. ती लग्नानंतर तिच्या माहेरी आली होती. परंतु माहेरी आल्यानंतर तिच्या डोक्यात वेगळेच काही शिजत होते. लग्नानंतरही ती तिच्या जुन्या प्रेमाला विसरली नाही. बाजारात सामान आणायला जाते असे सांगून ती गेली पण परत घरी आलीच नाही. नववधू घरी न परतल्याने तिच्या घरच्यांना काळजी वाटू लागली. तिला फोन केला असता तिचा फोन बंद येत होता. तिच्या वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये दोन तरुणांची नावे घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी अनेक ठिकाणी शोध घेऊनही ती सापडलीच नाही. अखेर ती पळून गेल्याची माहिती त्यांना मिळाली.
शाईफेकनंतर अयोध्या पोळ यांनी दिली पहिली प्रतिक्रिया म्हणाल्या, “ठाकरे गटाच्या बाजूने पोस्ट…”
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण नरैनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असून नववधूच्या वडिलांनी असे सांगितले की, त्यांनी 31 मे 2023 रोजी कालिंजर पोलीस स्टेशन परिसरात मुलीचे लग्न लावून दिले. ती सहा जून रोजी माहेरी परत आली होती. त्यानंतर ती 11 जून रोजी वस्तू घेण्याच्या नावाने बाजारात गेली ती माघारी फिरकली नाही. तिचा शोध घेतला असता ती प्रियकरासह पळून गेली असल्याचे समजले. तसेच तिने घरातून रोख रक्कम आणि दागिनेही लंपास केले आहेत.
कोंबडी अगोदर की अंड? शेवटी सापडलं उत्तर! शास्त्रज्ञांनी केला खुलासा