Site icon e लोकहित | Marathi News

Pulses Rate । सणासुदीच्या तोंडावर डाळींनी खाल्ला भाव! किलोला मिळतोय ‘इतक्या’ रुपयांचा दर

In the face of the festival, pulses ate Bhav! A kilo is getting 'so much' rate of Rs

Pulses Rate । पावसाचा परिणाम आता भाजीपाल्यापाठोपाठ डाळींवर (Pulses) होऊ लागला आहे. सणासुदीच्या तोंडावर डाळींच्या किमतीत (Pulses Price) कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे महागाईने होरपळलेल्या जनतेला आणखी एक फटका बसला आहे. डाळींच्या वाढलेल्या किमतींमुळे त्यांचे बजेट कोलमडू शकते. दरम्यान केंद्र सरकारच्या (Central Govt) सर्व प्रयत्नांनंतरही डाळींचे भाव वाढले आहेत. (Pulses Price Hike)

One Nation One Election । ‘वन नेशन-वन इलेक्शन’ होणार? केंद्र सरकारकडून समिती स्थापन

महिनाभरापूर्वी १३४ रुपये असणारी तूर डाळ (Tur Dal) थेट १७५ रुपयांवर गेली आहे. येत्या काळातही आणखी भाव वाढू शकतात. त्याशिवाय उडीद डाळ, हरभरा डाळ, मसूर डाळ आणि मूग डाळींच्या किमतीतही वाढ झाली आहे. या डाळींच्या दरात दोन महिन्यांत एकूण २० ते ३० रुपयांची वाढ झाली आहे. तूर आणि हरभरा डाळीची मागणी जास्त आणि साठा कमी आहे. (Latest Marathi News)

Political News । महाराष्ट्र हादरला! ठाकरे गटाच्या ‘या’ बड्या नेत्याने केली आत्महत्या

दरम्यान, जून-जुलै महिन्याच्या तुलनेत आता किचनचा खर्च साधारणतः १५ टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसली आहे. अशातच केंद्र सरकारकडून आता डाळींची आयात करत असणाऱ्या आयातदारांना कस्टम क्लिअरन्स मिळाल्यानंतर 30 दिवसांच्या आत डाळी बाजारात उतरवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Ajit Pawar । अजित पवारांना ED चा मोठा दिलासा! जाणून घ्या नेमकं प्रकरण

Spread the love
Exit mobile version