Katrina Kaif: ‘या’ चित्रपटात कतरिना दिसणार भूताच्या भूमिकेत, प्रेक्षकांची उडणार घाबरगुंडी

In the film 'Ya', Katrina will be seen in the role of a ghost, and the audience will be in awe

मुंबई : गेली काही वर्षं बॉलिवूडमध्ये स्त्री’, ‘रूही’ असे वेगवेगळे भुताचे चित्रपट (Ghost movies) प्रदर्शित करण्यात आले. चित्रपटातून केलेला हा वेगळा प्रयत्न प्रेक्षकांनी उचलून धरला आहे. आता पुन्हा एक असाच भयपट प्रेक्षकांची झोप उडवायला येणार आहे. तो म्हणजे गुरमीत सिंग दिग्दर्शित आणि रितेश सिधवानी, फरहान अख्तर यांच्या एक्सेल एंटरटेनमेंटच्या बहुप्रतिक्षित हॉरर-कॉमेडी ‘फोन भूत’ (phone bhoot )चित्रपट. या दिवाळीत 4 नोव्हेंबर 2022 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Rohit Sharma: मोठी बातमी! रोहित शर्माला पोलिसांकडून अटक? सोशल मीडियावर फोटो व्हायरल

दरम्यान या चित्रपटामध्ये कतरीना कैफ (Katrina Kaif) ही भूताची भूमिका (role) साकारताना दिसणार आहे. तसेच कतरीनाबरोबर या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टरही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘फोन भूत’ हा चित्रपट एक मजेशीर हॉरर-कॉमेडी आहे. कतरिना, सिद्धांत आणि ईशान खट्टर अभिनित त्यांच्या फर्स्ट लूकसह त्यांच्या कास्टिंगबाबत प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता होती. आतापर्यंत आपण कतरीनाला चित्रपटांमध्ये फक्त ग्लॅमरस भूमिकेत पाहिलं असून, कतरिना पहिल्यांदाच पडद्यावर भूताच्या भूमिकेत दिसणार आहे.

यंदाच्या वर्षी गाळप हंगाम सुरु होण्याआधीच ऊसतोड मजूर कारखान्यावर दाखल, उपासमारीची आली वेळ

इतर भयपटांप्रमाणे या चित्रपटालाही प्रेक्षक पसंत करतील की नाही हे येणारा काळच ठरवेल. ‘फोन भूत’ हा कतरिनाचा लग्नानंतरचा पहिला चित्रपट आहे, त्यामुळेदेखील रसिकांमध्ये या चित्रपटाविषयी उत्सुकता आहे. अलीकडेच, इंटरनेटद्वारे समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये, कतरीना कैफ, सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर सेटवर धम्माल करताना दिसले. शिवाय या तिघांनी ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमातही हजेरी लावली होती. कतरिनाच्या या नव्या चित्रपटासाठी तिचे चाहते चांगलेच उत्सुक आहेत.

Abdu Rojik: काय सांगता! अब्दु रोजिक आहे ‘एवढ्या’ संपत्तीचा मालक; वाचा सविस्तर

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *