Ajit Pawar । मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे फायरब्रॅन्ड नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत महायुतीत दमदार एंट्री केली आहे. त्यामुळे शिंदे गटाची चिंता वाढली आहे. शिंदे गटातील आमदारांचा वर्षभर मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet expansion) झाला नाही. परंतु अजितदादांसह ८ मंत्र्यांचा लगेचच विस्तार झाल्याने शिंदे गटातील आमदार चिडले आहेत. अनेकदा या गटातील आमदारांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. (Latest Marathi News)
Success Story । इंजिनिअरिंगची नोकरी न करता तिने केला गांडूळ खताचा व्यवसाय, आज आहे करोडोंची उलाढाल
मागील आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पार पडलेल्या महत्त्वाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना तुमच्या ठाण्यात एवढे मृत्यू कसे झाले? असा थेट सवाल विचारला होता. त्यावरून वादात ठिणगी पडली होती. हा वाद जास्त टोकाला जाऊ नये म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हस्तक्षेप केला होता. त्यामुळेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये या विषयावर पुन्हा चर्चा झाली नाही.
पाणी प्रश्न शेतकऱ्याचा आत्महत्येचा इशारा! तरीही नातेपुते पोलीस स्टेशनचे दुर्लक्ष
परंतु आता याच मुद्यावरुन शिंदे गटात धुसफूस वाढल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांना वेळीच आवरावे, अशी मागणी आता शिंदे यांचे निकटवर्तीय भाजप (BJP) नेत्यांकडे करणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यावरून भाजप कोणती भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.