वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या जेवणात निघाल्या आळ्या, परिसरात उडाली खळबळ

In the hostel, there was a stir in the student's food, there was excitement in the area

वर्धा : वर्ध्यातून (vardha) एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कारण वर्ध्याच्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयातील (Mahatma Gandhi International Hindi University) वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या जेवणात (meal) आळ्या निघाल्या आहेत. हे दूषित जेवण खाल्ल्याने काही विद्यार्थ्यांना उलट्या झाल्या तर काही विद्यार्थ्यांना (students) आणखी त्रास झाला. या प्रकारामुळे विद्यापीठाच्या परिसरात चांगलाच गोंधळ उडाला. यामुळे विद्यार्थ्यांनी मध्यरात्री वासतिगृहाताच आंदोलन केले. दरम्यान विद्यार्थ्यांनी भोजनालय चालविणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. रात्री नऊ वाजतापासून सुरू झालेले आंदोलन पहाटे दोन वाजेपर्यंत सुरू होते.

“बॉस असावा तर असा!” दिवाळीचा बोनस म्हणून कर्मचाऱ्यांना दिल्या चक्क 8 कार आणि 18 बाईक्स

प्रकृती अस्वस्थ झालेल्यांमध्ये पाच मुली आणि आठ मुलांचा समावेश आहे. मेसच्या जेवणाचे पैसे घेऊन देखील योग्य भोजन मिळत नसल्याचे विद्यार्थी सांगत आहेत. दरम्यान अखेर विद्यापीठ प्रशासनाने मध्यरात्री विद्यार्थ्यांशी चर्चा केली आणि तोडगा काढला व आंदोलन मागे घेण्यात आले. महत्वाची बाब म्हणजे या विश्व विद्यापीठात आत्ताच नाही तर गत दीड ते दोन महिन्यांपासून हा प्रकार सतत होत आहे. या संदर्भात येथील विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाला निवेदन देत माहिती दिली.

दिवाळीनिमित्त भारतीयांसाठी इंस्टाग्रामची खास ऑफर, रील्स बनवा अन्…; पाहा नेमकी काय आहे ऑफर?

या संपूर्ण प्रकराची माहिती विद्यापीठ प्रशासनाने अन्न व औषधी प्रशासनाला दिली आहे. यावेळी त्यांच्या चमूने या वसतिगृहात येत चौकशी करीत नमुने घेतल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान त्यांच्या कडून या जेवणाचा चौकशी अहवालाची प्रतीक्षा विद्यापीठ प्रशासनाला आहे. तसेच भोजनाचे कंत्राट असलेल्या व्यक्तीला या संदर्भात नोटीस बजावली आहे. दरम्यान अहवाल येताच या कंत्राटदारावर कारवाई करण्यात येईल.

Rutuja Latke: अंधेरी पोटनिवडणुकीतून ऋतुजा लटकेंचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा, कारण…

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *