दिल्ली : देशभरात कोरोना (Corona ) पुन्हा एकदा वाढत चालला आहे. गेल्या 24 तासामध्ये देशात कोरोना व्हायरसचे 16,167 रुग्ण आढळले आहेत. त्याचवेळी, कोरोना संसर्गामुळे गेल्या 24 तासात देशात 41 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या कोविड-19 च्या आकडेवारीनुसार, भारतातील नवीन कोविड-19 प्रकरणांमध्ये 13.7% घट झाली आहे ही काहीशी दिलासा देणारी बाब आहे. यासह, भारतात कोरोनाचे सक्रिय रुग्ण 1,35,510 वर पोहोचले आहेत.
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत, आतापर्यंत एकूण 206.56 कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत, ज्यामध्ये 93.60 कोटी लोकांना दुहेरी डोस आणि 10.88 कोटी लोकांना खबरदारीचे डोस देण्यात आले आहेत. गेल्या 24 तासात 34,75,330 डोस लोकांना देण्यात आले आहेत.
दिल्लीत गेल्या २४ तासांत कोरोना संसर्गाची ६९६ प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. यासह दिल्लीतील कोरोना बाधितांची संख्या 8045 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे.