मुंबई : सोशल मीडियावर दररोज अनेक नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हिडिओमध्ये काही व्हिडिओ फेमस होतात तर काही व्हिडिओमुळे वादाला तोंड फुटतं. असाच एक नवीन वादग्रस्त व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ गौतमी पाटीलचा (Gautami Patil) तिच्या या व्हायरल व्हिडिओमध्ये ती लावणीवर (planting) थिरकताना दिसत आहे. परंतु तिचे सादरीकरणातील हावभाव (Gesture) पाहता त्या थिरकण्याला लावणीला कलंकित करणारे आहेत. या व्हायरल व्हिडिओमध्ये गौतमी अगदी विचित्र हावभाव करून, अंगावर पाणी ओतून गौतमी नाचताना (dancing) दिसत आहे.
Thyroid: तुम्हालाही सकाळी ‘ही’ समस्या जाणवते का? असू शकतात थायरॉईडची लक्षणे
दरम्यान यावरून अनेक लोककला संवर्धक संघांनी तिला भेटून समज दिली आहे तर अनेक मराठी रोस्ट करणाऱ्या युट्युबर्सनी सुद्धा तिची चांगलीच शाळा घेतली आहे. खरतर या व्हिडीओवर शेकडो टीका जरी केलेल्या असल्या तरी हजारो प्रेक्षक या व्हिडिओमध्ये गौतमीसह नाचतनाही दिसत आहेत. यामुळे फक्त नाचणाऱ्या गौतमीला टार्गेट केलं जावं की प्रेक्षकांनाही दोषी धरावं असा वाद ऑनलाईन दिसत आहेत.
Boys 3: ‘बॉईज ३’ चित्रपटाने बॉक्सऑफिसवर कमावले तब्ब्ल ‘इतके’ कोटी रुपये; वाचा सविस्तर
मेघा घाडगे यांनीही घेतली भेट
गौतमी पाटीलचा विचित्र हावभावांचा लावणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मेघा घाडगे (Megha Ghadge) यांनी गौतमीची भेट घेऊन तिची कानउघाडणी केली आहे. घाडगे यांनी लावणीचे नाव अगोदरच वादात असताना अशा शुल्लक प्रसिद्धीसाठी केलेल्या विभत्स नृत्यावरून गौतमीची शाळा घेतली गेली. दरम्यान यानंतर गौतमी पाटीलने माफी मागणारा एक व्हिडीओ शेअर केला होता. तसेच काही तासांनी हा व्हिडीओसुद्धा डिलीट करण्यात आला होता.
मराठी युट्युबर्सनी व्यक्त केली नाराजी
गौतमीच्या या व्हिडिओवरून मराठी युट्युबर्सनी सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे. सध्या सोशल मीडियाच्या बायोमध्ये कोणीही स्वतःला डान्सर, आर्टिस्ट टाकून लावणी सम्राज्ञी म्हणायला लागले आहे. परंतु विठाबाई नारायणगावकर, मंगला बनसोडे, शाहीर पठ्ठे बापूराव, सुरेखा पुणेकर यांसारख्या कलाकारांनी जपलेली कला धुळीत मिळवण्याचं काम हे नकली कलाकार करत आहेत अशी भावना सर्वच युट्युबर्सनी व्यक्त केली आहे.