सोशल मीडियावर सतत चर्चेत असणार नाव म्हणजे अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale). कसबा पोटनिवणुकीमध्ये अभिजित बिचुकले यांनी अर्ज दाखल केला होता. यानंतर ते सतत चर्चेत राहिले. आता त्यांना किती मते मिळाली आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
“माझाच विजय होणार”, निकाल लागण्याच्या काही तासापूर्वीच रवींद्र धंगेकर यांचा मोठा दावा
माहितीनुसार, सहाव्या फेरी अखेर अभिजीत बिचुकले यांना चार मतं मिळाली आहेत. त्याचबरोबर ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी आनंद दवे यांनी देखील विजयाचा दावा केला होता त्यांना सहाव्या फेरी अखेर 100 मतं मिळाली आहे. यामुळे या दोन उमेदवारांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप आघाडीवर; तिसऱ्या फेरीमध्ये किती मते? वाचा एका क्लीकवर
कसबा पोटनिवडणूक बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांच्यामुळे चांगलीच चर्चेत आहे मात्र, यामध्ये रवींद्र धंगेकर आणि हेमंत रासने यांच्यात खरी लढत पाहायला मिळत आहे. आता यामध्ये रवींद्र धंगेकर आघाडीवर असल्याचं चित्र दिसत आहे.
शेतकऱ्यांनो ‘या’ कारणामुळे केळी काळी पडतात; जाणून घ्या वैज्ञानिक कारण