विविधतेने नटलेला आपला भारत देश हजारो वर्षांपासून संपूर्ण जगाला आपल्याकडे आकर्षित करत आहे. आजही येथील वैशिष्ट्यपूर्ण अशा अनेक गोष्टी संपूर्ण जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतात. भारतातील अनेक ठिकाणी प्रथा परंपरा चालवणारे लोक आहेत. आपल्या भारतात विविध धर्माचे लोक राहतात. त्यांचे सण उत्सव देखील विविध प्रकारे साजरे केले जातात. पण भारतात अशा काही प्रथा आहेत ज्या ऐकून तुम्ही थक्क व्हाल.
आळंदी वारीतील समोर आला पुन्हा एक धक्कादायक व्हिडीओ; वारकऱ्यांनी पोलिसांना..
हिमाचलमधील मणइकर्ण घाटीमधील पिणी गावात एक वेगळीच प्रथा आहे. माध्यमातील वृत्तानुसार, या गावातील महिला पाच दिवस निर्वस्त्र राहतात. या गावात ही विचित्र प्रथा पाळली जाते. ही प्रथा पुर्वीच्या लोकांनी पाडलेली आहे. श्रावण महिन्यातील पाच दिवस त्या गावातील एकही महिला वस्त्र घालत नाहीत. ही प्रथा न पाळणारर्या महिलेवर देवाचा कोप होतो, असे तेथील गावकरी सांगतात.
श्रावण महिन्यातील ते पाच दिवस पती पत्नीला एकमेकांसोबत बोलण्याची परवानगी दिली जात नाही. इतकं नाही तर त्या महिलांना घरातून बाहेर देखील जाता येत नाही. तसेच पती पत्नीला या काळात लांब रहावे लागते. तसेच या गावात बाहेरच्या व्यक्तीला येण्यास बंदी असते.
ब्रेकिंग! पाकिस्तानला बिपरजॉय चक्रीवादळाचा मोठा फटका; ३४ लोकांनी गमावला जीव तर 145 जण गंभीर जखमी
तसेच, श्रावण महिन्यात येथील पुरूष मंडळींना मांस आहार करण्यास मनाई आहे. त्यांनी मांस आहार केला तर त्यांच्यावर देव रागवतो असे सांगितले जाते. या सर्व प्रथे मागे एक रंजक किस्सा सांगितला जातो. गावकरी म्हणाले की, खूप वर्षांपूर्वी या गावावर राक्षसाचे राज्य होते. तो राक्षस सुंदर कपडे परिधान केलेल्या महिला उचलून न्यायचा. त्यावेळी ‘लहवा घोंड’ देवता प्रसन्न झाली होती. तिने राक्षसाचा वध केला. त्यामुळे तेथील गावकरी सुखाने जगू लागले. तेव्हापासून ही प्रथा पडली आहे.