नंदुरबार: नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती (Nandurbar Agricultural Produce Market Committee) ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची मिरची बाजारपेठ (Chilli market) आहे. दरम्यान आता नंदुरबारच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लाल मिरची खरेदीला सुरुवात झाली आहे. यावेळी या बाजार समितीत 1000 ते 1500 क्विंटल मिरचीची आवक (Chili Intake) होत असून दसऱ्यानंतर आवक वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या बाजार समितीत मिरचीला प्रतवारीनुसार 4000 पासून तर 5000 हजार रुपयांचा दर मिळत आहे. त्यामुळे मिरची उत्पादक शेतकऱ्यांमध्ये (Farmers) समाधान आहे.
Chandni Chowk: पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाणपूल अखेर स्फोटाने जमीनदोस्त
दरम्यान यंदाच्या वर्षी हंगाम चांगला असल्याने म्हणजेच या खरीप हंगामात मिरचीसाठी आवश्यक असलेले पोषक वातावरण आहे. त्यामुळे मिरची उत्पन्नात वाढ होणार आहे. इतकंच नाही तर लाल मिरचीला दरही चांगला मिळत असल्याने शेतकऱ्यांनी मिरची लाल करण्यावर भर दिला आहे. खरतर मिरची व्यापाऱ्यांचे परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. म्हणून दसऱ्यानंतरच बाहेरील व्यापारी मिरची खरेदी करण्यासाठी येतील असतात. दरम्यान यावर्षी मिरचीला चांगला भाव मिळत आहे. परंतु जर आवक वाढली तर भाव कमी जास्त होण्याचा अंदाज लावला जात आहे.
Milk: दुधाला FRP चं धोरण लागू करा, शेतकरी संघर्ष समितीची नव्या सरकारकडे मागणी
दरवेळी व्यापारी मिरची खरेदी करतात आणि पथार्यांवर वाळण्यासाठी टाकतात. परंतु यावर्षी व्यापाऱ्यांना जागेची समस्या निर्माण होऊ शकते. कारण शहराचा विस्तार वाढला असून ज्या ठिकाणी मिरची वाळवली जाते, तिथे प्लॉट पडले आहेत. त्यामुळे सरकारने मिरची व्यापाऱ्यांसाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे. तसेच गुंटूरनंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाची मिरची बाजारपेठ असलेली आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या मिरची उत्पादक जिल्ह्यात चिली पार्कला राज्य सरकार का चाल ढकल करत आहे हा मोठा प्रश्न आहे.