मोलगीत दातांचा दवाखान्याचे उद्घाटन, विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते संपन्न

Molgi

अक्कलकुवा (प्रतिनिधी ) । अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथे दातांचा दवाखान्याचे उद्घाटन विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी शुभहस्ते उत्साहात संपन्न झाले. मोलगी लिबीपाडा येथील न्यायाधीश डी.टी.वसावे यांची कन्या डॉ.पुष्पा वसावे हिने हा दवाखाना सुरू केला आहे. डॉ.पुष्पा वसावे हिने यापुर्वी पुणे येथे प्रॅक्टिस केली आहे.

Namdev Jadhav । आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नामदेव जाधव यांना काळ फासलं

अनेक डॉक्टर्स शहराना प्राधान्य देत असतात. मात्र डॉ.पुष्पा वसावे हिने आपल्या मायमातीला न विसरता, मोलगी सारख्या दुर्गम ग्रामीण भागातील रुग्णांची सोय व्हावी म्हणून हा दवाखाना सुरू केला आहे. या दवाखान्यात उपचारासाठी अदयायावत सुविधा असल्याने यामध्ये किडलेल्या दाताचे रुट कॅनल करणे, कॅप बसवणे, इंप्लांट,दात काढणे, व नवीन दात बसवणे, सर्व जबड्याशी संबंधित आजारांवर उपचार होणार असल्याने मोलगी सारख्या दुर्गम भागातील जनतेची मोठी सोय होणार असल्याचे मत विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांनी बोलताना व्यक्त केले.

Salman Khan And Imran Hashmi Video । सलमान खानने स्टेजवरच इमरान हाश्मीला केलं किस; व्हिडीओ झाला व्हायरल

यावेळी विशेष सरकारी अभियोक्ता राजेंद्र वळवी, ॲड.अभिजित वसावे, ॲड.रुपसिंग वसावे, ॲड.रविंद्र वसावे, ॲड.गजमल वसावे, ॲड.सावंत वसावे, ॲड.सरदार वसावे, कालुसिंग वसावे, ॲड.संग्राम पाडवी, हिराबाई वसावे, माजी सरपंच आपसिंग वसावे, सामाजिक कार्यकर्ते धनसिंग वसावे, डाब सरपंच आकाश वसावे, कात्री सरपंच संदीप वळवी, डॉ.दिलवरसिंग वसावे, डॉ.सायसिंग वसावे, डॉ. कुवरसिंग वसावे, डॉ, महेंद्र वळवी, डॉ.सुनिल वळवी,सामाजिक कार्यकर्ते हिरामण पाडवी, बिरसा ब्रिगेडचे संदीप वळवी यांसह डॉक्टर ,वकील, सामाजिक कार्यकर्ते,लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Car Accident । लग्नसमारंभावरून परतताना काळाने घातला घाला, कार झाडाला धडकल्याने ५ जणांचा मृत्यू

Spread the love