दिल्ली : सध्या भारतात मंकीपॉक्स च्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेणे खुप गरजेचे आहे. यासाठी जर तुम्ही काही निवडक खाद्यपदार्थांचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढेल. यामुळे मंकीपॉक्स पासून दूर राहण्यास मदत मिळेल.
मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आपल्या देशाची राजधानी दिल्ली या ठिकाणी आढळून आला होता. मंकीपॉक्सची लक्षणे पाहिली तर कांजण्यांप्रमाणे आपल्या शरीरावर पुरळ उठतात, जास्त ताप हे देखील याचे लक्षण आहे. भारतामध्ये सध्या रुग्ण वाढू लागले आहेत. यामुळे काही निवडक खायपदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. जेणेकरून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढून मंकीपॉक्सपासून दूर राहण्यास मदत करेल.
व्हिटॅमिन सी द्वारे तुम्ही रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही आहारात लिंबू आणि लिंबू वर्गीय आंबट पदार्थाचा समावेश करू शकना जर तुम्हाला ते आवडत नसेल तर पपईसह इतर गोड खा. यामुळे तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होईल.
दररोज तुळशीच्या पानाचे सेवन केल्याने देखील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. जर रुग्णाला तुळशीच्या पानापासून बनवलेले पाणी दिल्यास रुग्ण लवकर बरा होतो. त्याचबरोबर पुदिन्याचे सेवन करणे देखील शरीरासाठी उत्तम ठरते.