Site icon e लोकहित | Marathi News

बीबीसीवर आयकर विभागाची धाड! काँग्रेसने केली केंद्र सरकारवर टीका

Income tax department attack on BBC! Congress criticized the central government

गुजरात दंग्यावर आधारित माहितीपटावरुन बीबीसी चांगलेच चर्चेत आले होते. दरम्यान बीबीसीच्या दिल्ली येथील कार्यालयात आज ( दि.15) प्राप्तीकर विभागाने धाड टाकली आहे. आयकर विभागाचे ( Income Tax) अधिकारी याठिकाणी झडती घेत आहेत. दिल्लीतील सर्व कर्मचाऱ्यांचे फोन जप्त करण्यात आले असून अकाउंट ऑफिसमध्ये ठेवण्यात आलेल्या संगणकामधील डेटा देखील चेक केला गेला आहे. इतकंच नाही तर कोणत्याही कर्मचाऱ्याला या कार्यालयातून बाहेर जायची परवानगी देण्यात आलेली नाही.

“…तर शिंदेंचं मुख्यमंत्रीपद जाऊ शकत”, वाचा नेमकं काय म्हणतात घटनातज्ञ

दिल्लीसोबत बीबीसीच्या मुंबई कार्यालयात सुद्धा आयकर विभागाने धाड टाकली आहे. आज सकाळपासून ही कारवाई सुरू आहे. आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई कार्यालयात आलेली टीम दिल्लीची आहे. बीबीसीच्या ( BBC) कार्यालयांमध्ये आर्थिक गैरव्यवहार होत असल्याची माहिती आयकर विभागाला मिळाली होती. यामुळे ही कारवाई सुरू आहे.

“देवेंद्र फडणवीस हे दहावं आश्चर्य महाराष्ट्रात बसलंय”, संजय राऊतांचा हल्लाबोल

या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने ( Congress Party) केंद्र सरकारवर टीका केली आहे. बीबीसीचा माहितीपट आला. त्यावर केंद्र सरकारने बंदी आणली. त्यानंतर लगेचच बीबीसीच्या कार्यालयांवर आयकर विभागाचे छापे पडले. ही अघोषित आणीबाणी आहे. अशा आशयाचे ट्विट काँग्रेस पक्षाने केले आहे.

माझ्यासोबत दोनदा विश्वासघात झाला, फडणवीसांनी सांगितला ‘तो’ किस्सा

Spread the love
Exit mobile version