
मुंबई : देशभरात नवरात्रीचा जल्लोष सगळीकडे पाहायला मिळत आहे. सर्व लोक आनंदाने नवरात्रीउत्सवात तल्लीन झाले आहेत. देशभरासह राज्यात नवरात्री उत्सव आनंदात चालू असताना आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गरबा खेळताना आतापर्यंत हृदयविकाराच्या धक्क्याने चार पेक्षा जास्त तरुणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. देशातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील चार जणांचा समावेश असून मुंबईमधील दोघे जण आहेत.
शेतकऱ्यांची चिंता वाढली! कापूस पिकावर रोगाचा प्रादुर्भाव, उत्पादनात होणार मोठी घट
एकीकडे लोक नवरात्रीचा आनंद घेत आहेत तर दुसरीकडे मात्र हृदयविकारामुळे मृत्यूच्या घटना घडत आहेत. गुजरातमध्ये 21 वर्षाच्या युवकाचा गरबा खेळताना मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. गरबा खेळताना युवक अचानक बेशुद्ध होऊन त्याचा मृत्यू झाला आहे.
धक्कादायक! नवरात्रीनिमित्त घातलेल्या मंडपाला आग लागून दोन जणांचा मृत्यू तर, ६४ जण होरपळले
त्याचबरोबर मुंबईमधील मुलुंड परिसरामध्ये 1 ऑक्टोबरच्या रात्री ऋषभ लहरी या युवकाचा मृत्यू झाला. गरबा खेळताना त्याला तीव्र हृदयविकाराचा झटका आला व त्यामध्येच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! २० ऑक्टोबरपर्यंत मिळणार ५० हजारांचे प्रोत्साहन अनुदान, वाचा सविस्तर