
मुंबई : दिवाळीच्या मुहूर्तावर दूध उत्पादकांना (Milk producer) दिलासा देणारी एक बातमी समोर आली आहे. गोळुळ दूध संघाने दुधाच्या दरामध्ये वाढ करून दूध उत्पादकांना दिवाळी भेट दिली आहे. यामध्ये म्हशीच्या (buffalo) आणि गाईच्या (cow) दूध खरेदी दरामध्ये वाढ करण्यात आलीये. शुक्रवारपासून नव्या दूध दरवाढीबाबत अंमलबजावणी केली जाणार आहे.
दिवाळीनंतर कांद्याचा भाव जाणार 50 रुपयांवर, व्यापाऱ्यांनी व्यक्त केला बाजारभावाचा अंदाज
पहा नवीन दर –
नवीन दरांप्रमाणे गाईच्या दूध (milk) खरेदी दरामध्ये प्रति लिटर 3 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आणि म्हशीच्या दूध खरेदी दरामध्ये प्रति लिटर 2 रुपये वाढ करण्यात आलीये. दरवाढीनंतर आता गाईला प्रति लिटर 35 रुपये दर तर म्हशीला प्रति लिटर 47.50 पैसे मिळणार.
धक्कादायक घटना! दौंडमध्ये घरफोडून १० लाख ७२ हजारांसह दागिने लंपास
गोळुळ दूध संघाच्या (Powdered Milk Union) या निर्णयामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. मागच्या दिड वर्षांमध्ये 9 रुपयांची दूध दरवाढ झालेली आहे. त्याचबरोबर आतापर्यंत सहा वेळा दूध खरेदी-विक्री दरामध्ये वाढ करण्यात आलीये.
मोठी बातमी! जिल्हा परिषदेच्या २८७ शाळा बंद होण्याच्या मार्गावर? राज्य सरकारने घेतला निर्णय