Sanjay Gaikwad । मागील काही दिवसांपासून शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे चर्चेचा विषय बनत आहेत. याला कारणही अगदी तसेच आहे. डॅशिंग आणि फायरब्रँड संजय गायकवाड यांची वादग्रस्त भूमिकेमुळे चर्चा होत आहे. अशातच आता संजय गायकवाड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण लवकरच त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. (Latest marathi news)
Accident News । शिवसेनेच्या आमदाराच्या गाडीचा भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू
एका महिलेची शेतजमीन हडपून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याच्या आरोपाखाली न्यायालयाकडून संजय गायकवाड तसेच त्यांचा मुलगा मृत्युंजय गायकवाड (Mrityunjay Gaikwad) आणि आणखी दोघंविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. गळ्यातील हारात वाघाचा दात असल्याचा दावा तसेच वाघाची शिकार आपण स्वतः केल्याचा दावा गायकवाड यांनी केला होता.
तसेच नुकत्याच पार पडलेल्या शिवजयंतीच्या भव्य शोभायात्रेत गायकवाड यांनी पोलिसांच्या हातातील लाठी घेऊन तरुणांना बेदम मारहाण केली होती. यावरऔन आता राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. लवकरच त्यांच्यावर या प्रकरणी कारवाई होऊ शकते.
Sharad Pawar । … तर आम्ही तुमच्यासोबत राहू, शरद पवारांनी दिली सरकारला खात्री