
साखरेच्या बाबतीत एक गोड माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलेनेत यंदा साखरेच्या उत्पादनात (Sugar Production) वाढ झालेली आहे. यामुळे केंद्र सरकार पासून सामन्यांपर्यंत सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. दरम्यान उत्पादनात वाढ झाल्याने अगामी काळात साखरेच्या दरात घसरण देखील होऊ शकते.
ब्रेकिंग! ज्येष्ठ गायिका वाणी जयराम यांचे निधन
इंडियन मिल असोसिएशनने (IMA) नुकतीच एक आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार, मागील चार महिन्यांत साखरेचे उत्पादन 3.42 टक्क्यांनी वाढून ते 193.5 लाख टन इतके झाले आहे. मागील वर्षी ऑक्टोंबर ते जानेवारी या कालावधीमध्ये हेच उत्पादन 187. 1 लाख टन होते. यंदा यामध्ये 6 लाख टनांनी वाढ झाली आहे.
मोठी बातमी! शुभांगी पाटील यांचा शिवसेनेत अधिकृत प्रवेश
दिवसेंदिवस देशातील साखर उत्पादन राज्यांच्या संख्येत वाढ होत आहे. परंतु, महाराष्ट्र राज्य साखर उत्पादनात आघाडीवर असून देशात पहिल्या स्थानावर आहे. यानंतर दुसऱ्या स्थानावर उत्तरप्रदेश व तिसऱ्या स्थानावर कर्नाटक राज्य आहे. यंदाच्या वर्षी साखर उत्पादनात वाढ होण्यामागे मोठे कारण म्हणजे साखर कारखान्यांच्या संख्येत झालेली वाढ!
इंस्टाग्राम रिल्स मधूम ‘असे’ कमवा पैसे! फक्त व्हिडीओ बनवून व्हाल मालामाल
मागील वर्षी महाराष्ट्रात ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीत 72. 9 लाख टन उत्पन्न होते. यावर्षी ते 73. 8 लाख टन झाले आहे. तसेच उत्तर प्रदेश व कर्नाटक येथे देखील सरासरी एक लाख टन साखरेच्या उत्पन्नात वाढ झाली आहे.
महत्वाची बातमी! भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक नाराज