
Indapur Crime । पुणे-सोलापूर बायपास रोडवरील रेस्टॉरंटमध्ये जेवण करणाऱ्या एका व्यक्तीची पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. अविनाश बाळू धनवे असे मृताचे नाव आहे. तो व्यवसायाने प्रॉपर्टी डीलर होता. मिळालेल्या माहितीनुसार, मागच्या पाच दिवसापूर्वी रात्री आठच्या सुमारास इंदापूर येथील जगदंबा रेस्टॉरंटमध्ये अविनाश धनवे यांच्यासोबत जेवण घेण्यासाठी तिघेजण थांबले. यावेळी रेस्टॉरंटमध्ये दोन जण आले आणि त्यांनी अविनाशच्या डोक्यात थेट गोळी झाडली आणि धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या घटनेमुळे इंदापूर चांगलेच हादरून गेले आहे.

Manoj Jarange । मनोज जरांगे पाटलांकडून सर्वात मोठा गौप्यस्फोट
दरम्यान आता याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. या हत्येमधील एका आरोपीला पिंपरी- चिंचवडच्या गुन्हे शाखा युनिट तीन ने ताब्यात घेऊन इंदापूर पोलिसांच्या स्वाधीन केल्याची माहिती समोर आली आहे. राहुल संदीप चव्हाण असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. तो आळंदीत मैत्रिणीला भेटायला आला होता. त्यावेळी त्यांनी त्याला अटक केली आहे.
ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपास सुरु केला. यानंतर राहुल चव्हाण हा आळंदी या ठिकाणी त्याच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. सध्या आरोपी इंदापूर पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस त्याची चौकशी करत आहेत.
Kangana Ranaut | ब्रेकिंग! “…ते सहन करू शकत नाही” अभिनेत्री कंगनाला बसला मोठा धक्का