Indapur News । इंदापूरमध्ये तहसीलदारावर प्राणघातक हल्ला, डोळ्यात मिरीची टाकून मारहाण करण्याचा प्रयत्न; धक्कादायक माहिती समोर

Indapur News

Indapur News । इंदापूर येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे काही अज्ञातांनी तहसीलदारांच्या वाहनावर लोखंडी रॉडने हल्ला केला. या घटनेनंतर हल्लेखोरांनी मिरची पावडर देखील फेकली. ही घटना 24 मे रोजी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास शहरातील संविधान चौकात घडी आहे. तहसीलदारांची जीप चौकाजवळ येताच हल्लेखोरांनी त्यांच्या जीपवर हल्ला केला.

Pune Accident । ‘फिर से दिखा दुंगा सडक पे खेल’; पोर्शे कार अपघातातील माजोरड्या मुलाचा संतापजनक व्हिडीओ व्हायरल

हल्लेखोरांनी सोबत मिरची पावडरही आणली होती. त्यांनी तहसीलदारांच्या डोळ्यात मिरचीपूड फेकण्याचा प्रयत्न केला मात्र सुदैवाने ते या घटनेतून थोडक्यात बचावले. तर त्यांच्या जीपची काच फुटली. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Accident News । अतिशय भीषण अपघात! बसला ट्रकची जोरदार धडक; एकाच कुटुंबातील ७ जणांचा जागीच मृत्यू तर २५ जखमी

श्रीकांत पाटील काय म्हणाले?

या हल्ल्यानंतर ते नेहमीप्रमाणे इंदापूर प्रशासकीय केंद्राकडे जात असल्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी सांगितले. यावेळी त्यांची जीप संविधान चौकात येताच एका हल्लेखोराने चारचाकी वाहनातून खाली उतरून त्यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला, त्यामुळे त्यांच्या जीपची काच फुटली. यावेळी हल्लेखोरांनी त्याच्यावर मिरचीपूड फेकण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जीव वाचवण्याचा प्रयत्न करताच आणखी दोन-तीन हल्लेखोरांनी हल्लेखोरांच्या गाडीतून खाली उतरून त्यांच्यावर हल्ला केला.

Pune Porsche Accident Case । ब्रेकिंग! पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी मोठी अपडेट; आरोपीचा जामीन रद्द

याबाबत श्रीकांत पाटील यांनी कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करून पोलिसांत तक्रार करणार असल्याचे सांगितले आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलीस सतर्क झाले असून इंदापूर तालुक्यात सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली आहे.

Nilesh Lanke । ब्रेकिंग! निलेश लंके यांच्या ट्विटमुळे राजकारणात मोठी खळबळ

Spread the love