Indapur News । निरगुडे येथे चारा छावणीसह गंभीर दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी भगवान खारतोडे यांचे मागील पाच दिवसापासून बैल जोडी सह उपोषण सुरूच आहे. या उपोषणाला पाठिंबा म्हणून इंदापूर तालुक्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष व मा.उपसरपंच संदीप चांदगुडे तसेच महसोबाची वाडी ग्रामपंचायत चे सरपंच राजेंद्र राऊत तसेच प्रशांत चांदगुडे यांनी उपोषण स्थळी जाऊन भगवान खारतोडे यांना पाठिंबा दिला. यावेळी म्हसोबाची वाडी व निरगुडे गावचे ग्रामस्थ देखील उपस्थित होते.
भगवान खारतोडे यांच्या मागण्या पुढील प्रमाणे आहेत
इंदापूर तालुक्यामधील उजनीचा भाग व नद्यांचा भाग वगळून मध्यम बाकीचे भागातील गावात अतितीव्र गंभीर दुष्काळ म्हणून जाहीर करावा
बाजरी कांदा सोयाबीनचा पिकविमा शेतकन्यांच्या खात्यामध्ये जमा करणेत यावा दुष्काळामुळे चारा छावणी व चारा डेपो सुरू करावेत. विजबील माफ करण्यात यावे. चालू व मागील थकीत संपुर्ण कजमाफी करून उतारा कोरा करणेत यापा शेततळे खोदाई अनुदानामध्ये वाढ तसेच अस्तरीकरण करणेच्या अनुदानात करणेत यावी.
Crime News । हृदय पिळवून टाकणारी घटना! 14 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या, दगडाने चेहरा ठेचला अन्…
कोरोना काळात रेशनचे अन्न धान्य दोन शिधापत्रिकांचे वाटप केले, तसेच दुष्काळ परीस्थिती झाल्याने दोन शिधाप्रत्रिकांचे वाटप करण्यात यावे पर्जन्यमापक यंत्र मौजे निरगुडे येथे बसविण्यात यावे. मौजे निरगुडे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात एक दिवस केंद्रतील डॉक्टर यांनी भेट दयावी. अशा मागण्या आहेत.