
Indapur News । अक्षय साळुंखे यांची राष्ट्रवादी वैद्यकीय मदत कक्ष इंदापूर तालुका साठी निवड झाली आहे. त्यांचे म्हसोबाची वाडी ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. इंदापूर तालुक्याचे विद्यमान आमदार माननीय श्री दत्तात्रय मामा भरणे यांचे सुपुत्र श्रीराज भैया भरणे यांनी अक्षय साळुंखे यांना नियुक्तीचे पत्र त्यांच्या निवासस्थानी दिले व त्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दिल्या.
म्हसोबाच्या वाडीतील ग्रामस्थांकडून अक्षय साळुंखे यांचे खूप खूप कौतुक करण्यात आले आणि गावातील सर्व ग्रामस्थांनी अक्षय साळुंखे यांना आम्ही तुझ्या पाठीशी आहोत असेही सांगण्यात आले. उपस्थितांमध्ये इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री संदीप मारुती चांदगुडे हे होते. त्याचबरोबर इंदापूर तालुका सरचिटणीस पंकज चांदगुडे, प्रदीप दादा गार्डकर पुणे जिल्हा अध्यक्ष हनुमंत आबा कोकाटे शुभम निंबाळकर सचिन सपकाळ हे देखील उपस्थित होते.
संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष शिवश्री अविनाश मारुती चांदगुडे तसेच युवक चैतन्य भोसले हे देखील उपस्थित होते यावेळी उपस्थित होते. इंदापूर तालुक्याचे विद्यमान आमदार तसेच माजी राज्यमंत्री माननीय श्री दत्तात्रय मामा भरणे व श्री राज भैय्या भरणे यांनी उपस्थित राहून अक्षय साळुंखे यांना शुभेच्छा दिल्या.