Agriculture News । देशाच्या अर्थव्यवस्थेत शेतीचा मोठा वाटा आहे. परंतु शेतकऱ्यांना शेती करताना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने अनेक योजना राबवायला सुरुवात केली आहे. त्यापैकी राज्य सरकारची (State Govt) एक योजना म्हणजे डीपी योजना (DP Scheme) होय. या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला स्वतंत्र डीपी दिली जाते. तुम्हीही या योजनेचा लाभ घेऊ शकता. जाणून घ्या अर्ज प्रक्रियेसह सविस्तर माहिती. (Latest Marathi News)
Agriculture News । शेतकऱ्यांवर दुहेरी संकट! शेतीसोबत दुध व्यवसायही धोक्यात
शेतकऱ्यांना सतत वीज टंचाईचा सामना करावा लागतो. अनेकदा तर विजेअभावी पिके जळून जातात. याच पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांना नियमितपणे आणि अखंडित असा विजेचा पुरवठा व्हावा यासाठी सरकारकडून योजनेच्या (Government Scheme) माध्यमातून एक स्वतंत्र ट्रांसफार्मर उपलब्ध करून दिला जात आहे. त्यासाठी शेतकऱ्याला काही रक्कम भरावी लागते.
Havaman Andaj : पुढील पाच ते सहा दिवस राज्यात कसा असेल हवामान अंदाज? जाणून घ्या एका क्लिकवर
किती लागतात पैसे?
सर्वसामान्य प्रवर्गातील शेतकऱ्यांना सात हजार रुपये प्रति एचपी तसेच एससी आणि एसटी प्रवर्गातील शेतकऱ्यांना पाच हजार रुपये प्रति एचपीचा खर्च भरावा लागतो. पाच हेक्टर पेक्षा जास्त जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति एचपी 11 हजार रुपये खर्च येतो. अतिरिक्त खर्च राज्य सरकारच्या माध्यमातून भरला जातो. तर दोन हेक्टर पेक्षा ज्यांच्याकडे कमी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून मदत केली जाते.
Rain Update | पावसाने मोडला तब्बल १२२ वर्षांचा रेकॉर्ड, क्षणांतच इमारती जमीनदोस्त
आवश्यक कागदपत्रे
जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे पॅन कार्ड, आधार कार्ड आणि रेशन कार्ड, पासबुकची प्रत, सातबारा उतारा आणि आठ चा उतारा या कागदपत्रांची गरज भासेल. समजा लाभार्थी जर अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील असल्यास त्यांना जातीचा दाखला गरजेचा आहे.
अर्ज प्रक्रिया
या योजनेत अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना Mahadiscom च्या अधिकृत वेबसाईटवर (DP Scheme Application) जावे लागणार आहे. तसेच अर्ज दाखल करताना Agriculture क्षेत्र, हॉर्स पॉवर, मोबाईल क्रमांक, अर्जदारांची माहिती, ईमेल इत्यादी माहिती काळजीपूर्वक टाकावी.