मुंबई : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला सोमवारी पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजचा सामना करावा लागणार आहे. पहिला सामना भारताने सहज जिंकला. आता टीम इंडियाचा प्रयत्न दुसरा सामना जिंकून कॅरेबियन संघाला बॅकफूटवर ढकलण्याचा असेल. सध्या संघ ज्या पद्धतीने खेळत आहे, ते पाहता हे घडणे फारसे अवघड वाटत नाही. भारताने आतापर्यंत यजमानांना विंडीज दौऱ्यावर, तीन वनडे आणि एक टी-२० मध्ये पराभूत केले आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना सोमवारी (1 ऑगस्ट) सेंट किट्स येथे खेळला जाणार आहे. टीम इंडियाची नजर मालिकेत सलग दुसऱ्या विजयावर आहे. 29 जुलै रोजी त्रिनिदाद येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात यजमानांचा 68 धावांनी पराभव केला. भारतीय संघ सेंट किट्सच्या बॅसेटेरे येथे प्रथमच टी-20 सामना खेळणार आहे.
वेस्ट इंडीज:
काइल मेयर्स, शामर ब्रूक्स, निकोलस पूरन (सी), जेसन होल्डर, रोव्हमन पॉवेल, शिमरॉन हेटमायर, ओडिन स्मिथ, अकिल हुसेन, कीमो पॉल/हेडन वॉल्श जूनियर, अल्झारी जोसेफ, ओबेद मॅकाए.
भारत:
रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, दिनेश कार्तिक, आर अश्विन, रवी बिश्नोई, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग