Site icon e लोकहित | Marathi News

भारत जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश

India is the largest milk producing country in the world

भारतात अनेक शेतकरी (Farmer) शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय करतात. सध्या बरेच शेतकरी दुधाचा व्यवसाय करताना दिसून येत आहे. त्यामुळे भारतात दुधाच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक (Milk Production) देश ठरलाय. कारण जागतिक पातळीवरील दूध उत्पादनामध्ये भारताचा 24 टक्के वाटा आहे.

कसबा व चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचाराला आजपासून सुरवात; दिग्गज नेते राहणार उपस्थित

दूध उत्पादनामध्ये भारत हा पहिल्या क्रमांकावर आहे. अन्न आणि कृषी संघटनेच्या कॉर्पोरेट सांख्यिकी डेटाबेस मधील उत्पादनविषयक माहितीनुसार याबाबत आकडेवारी समोर आली आहे. केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुपालन तसेच दुग्धविकास मंत्री पुरुषोत्तम रुपाला (Purushottam Rupala) यांनी याबाबत माहिती दिली आहे.

Gautam Adani: उद्योगपती गौतम अदानी यांना अजून एक मोठा धक्का!

भारताने वर्ष 2021-22 मध्ये जागतिक पातळीवरील दूध उत्पादनात 24 टक्के योगदान नोंदवत पहिला क्रमांक पटकवला आहे. त्याचबरोबर मंत्री पुरुषोत्तम रुपाला म्हणाले, वर्ष 2021-22 मध्ये देशातील दूध उत्पादन 22 कोटी टनांपर्यंत वाढ झाली आहे.

एका जागेसाठी 21 उमेदवार! कसबा विधानसभा पोटनिवडणुकी कोण कोण उतरलंय मैदानात? वाचा सविस्तर

Spread the love
Exit mobile version