Site icon e लोकहित | Marathi News

भारत जगात सर्वात जास्त फळांचे उत्पादन करणारा देश – शरद पवार

India is the largest producer of fruits in the world - Sharad Pawar

एकेकाळी अन्नधान्यासाठी इतर देशांवर अवलंबून असणारा भारत हा सध्या कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. दरम्यान, राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा शरद पवार ( Sharad Pawar) यांनी भारत जगात सर्वात जास्त फळांचे उत्पादन करणारा देश ( Fruit production) असल्याचे मत मांडले आहे. 15 वर्षांपूर्वी स्वतः शरद पवार यांनीच फळबाग लागवडी संबंधित प्रचार राष्ट्रीय पातळीवर न्यावा अशी योजना आखली होती. देशातल्या कुठल्याही बाजारात गेलो की, तेथे भारताचा शिक्का बघायला मिळतो. असे म्हणत शरद पवार यांनी समाधान व्यक्त केले आहे.

‘त्या’ 19 बंगल्यांमुळे रश्मी ठाकरे गोत्यात! किरीट सोमय्या यांनी पोलिसांत दिली तक्रार…

शरद पवार सध्या इंदापूर ( Indapur) दौऱ्यावर आहेत. यामध्ये ते विविध ठिकाणांच्या शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधत आहेत. या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्यातील बोरी गावात शरद पवारांनी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधत काही महत्त्वाच्या बाबी सांगितल्या आहेत. आज देशात मोठ्या प्रमाणावर द्राक्षाचे उत्पादन होत असून परदेशात देखील द्राक्षाची निर्यात होत असल्याची माहिती यावेळी शरद पवार यांनी दिली.

पुणे तिथे काय उणे! पुण्यातील व्यक्तीने झोमॅटोवर वर्षभरात ऑर्डर केले तब्बल 28 लाखांचे जेवण

भारतात एकेकाळी 86 टक्के लोक शेती करायचे. मात्र सध्या तो आकडा 60 टक्क्यांवर आला आहे. सध्या महाराष्ट्रातील काही गावांमधील शेतकरी प्रतिकूल परिस्थितीत देखील नेटाने शेती करत आहेत. यामुळे या शेतकऱ्यांबद्दल आपल्याला आत्मीयता असल्याचे शरद पवार यांनी या दौऱ्यात सांगितले आहे.

एकनाथ शिंदेंचा अजित पवारांना टोला; म्हणाले,”त्यांच्या सारख्या नेत्यांनी असे बोलणे…”

Spread the love
Exit mobile version