मुंबई : आशिया कप 2022 यावेळी टी-20 फॉरमॅटमध्ये खेळाला जात आहे. दरम्यान या स्पर्धेमध्ये उद्या 28 ऑगस्ट रोजी भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) या दोन्ही संघामध्ये मोठा सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ जोरदार तयारी सुरू आहे. यावेळी आशिया चषक यूएईमध्ये होत असून, भारत-पाकिस्तान सामना दुबई (Dubai) स्टेडियमवर होत आहे. श्रीलंका हा आशिया कपचा अधिकृत आयोजक असल्याची माहिती देण्यात आली आहे.
भारत-पाकिस्तान या दोन्ही संघांच्या T20 च्या आकडेवारी पाहिली तर, दोन्ही संघांमध्ये T20 चे एकूण 9 सामने झाले आहेत.या 9 सामन्यांनमध्ये भारतीय संघाने 7 आणि पाकिस्तान संघाने 2 सामने जिंकले आहेत.2021विश्वचषक मध्ये पाकिस्तानने सामना जिंकला होता आणि भारत पराभूत झालं होत.त्यामुळे आता या पराभवाचा बदला घेण्यासाठी भारतानं जोरदार तयारी सुरू केली आहे.आशिया कप 2022 यावेळी टी-20 फॉरमॅटमध्ये खेळाला जात असल्याने त्याचबरोबर टी-20 मध्येही भारताचे पारडे पाकिस्तानवर जड राहणार आहे.
Uday Lalit: मोठी बातमी! कोकणच्या उदय लळीत यांनी घेतली सरन्यायाधीश पदाची शपथ
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 200 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत.त्यामध्ये पाकिस्तानने 87 सामने जिंकले आहेत, तर भारताने 71 सामने जिंकले आहेत. तर दुसरीकडे भारत आणि पाकिस्तानमध्ये 132 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. त्यामध्ये पाकिस्तानने 73 आणि भारताने 55 सामने जिंकले होते.