आर्थिक फसवणूकीच्या गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. विशेष म्हणजे फक्त अशिक्षितच नाही तर सुशिक्षित लोकांना देखील आर्थिक फसवणुकीला ( Cheating) सामोरे जावे लागत आहे. दरम्यान भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू उमेश यादव याची तब्बल 44 लाखांची आर्थिक फसवणूक झाली आहे. या पार्श्वभूमीवर त्याने नागपूरमधील कोराडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
शिक्षकाकडून विद्यार्थ्यांला लाथा बुक्क्यांनी मारहाण; व्हिडीओ होतोय व्हायरल
फास्ट बॉलर उमेश यादव ( Umesh Yadav) याचा जुना मॅनेजर शैलेश यादव याने ही फसवणूक केली असून पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. उमेश यादवने प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी काही रक्कम बाजूला ठेवली होती. कोराडी हद्दीतील एमएसईबी कॉलनी येथील स्टेट बँक शाखेतील खात्यात त्याचे एकूण 44 लाख रुपये होते. हे 44 लाख रुपये शैलेश ठाकरे याने परस्पर काढून स्वतःच्या नावावर प्रॉपर्टी खरेदी केली.
वंचित बहुजन आघाडी व शिवसेना एकत्र येणार? प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्हॅलेंटाईन डे पर्यंत काहीही… “
उमेश यादवची भारतीय क्रिकेट संघात ( Indian Cricket team) निवड झाल्याने त्याला अनेकदा देशात आणि देशाबाहेर खेळण्यासाठी जावे लागते. यामुळे त्याने आरोपी शैलेश ठाकरे याला पत्रव्यवहार, इन्कम टॅक्स, बँकेचे व इतर व्यवहाराकरीता पगारी मॅनेजर म्हणून ठेवले होते. महत्त्वाची बाब म्हणजे शैलेश हा त्याचा मित्रच आहे. सध्या पोलीस आरोपीचा तपास घेत आहेत.
शेतकऱ्यांना लग्नासाठी मुलगी मिळणे मुश्किल; केंद्रीय मूल्य आयोगाच्या बैठकीत शेतकऱ्यांनी मांडली व्यथा