
भारतीय क्रिकेट संघ सध्या चांगलाच नावारूपाला आला आहे. फलंदाजी, गोलंदाजी यष्टीरक्षण यामध्ये भारतीय संघ आघाडीवर आहे. अशातच बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी नुकतेच काही धक्कादायक खुलासे केले आहेत. यामुळे भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू अडचणीत येऊ शकतात.
नवनीत राणा व रवी राणा यांच रामदेव बाबांमुळेच जुळलं! दोघांची इंटरेस्टिंग लव्हस्टोरी एकदा वाचाच
भारतीय क्रिकेट संघ ( Indian cricket team) डोपिंगच्या विळख्यात अडकला असल्याची माहिती चेतन शर्मा यांनी दिली आहे. क्रिकेट संघातील अनेक चांगले चांगले खेळाडू स्वतःला फीट ठेवण्यासाठी इंजेक्शन घेतात. ही गोष्ट बीसीसीआयला सुद्धा माहिती आहे. मात्र क्रिकेट बोर्डकडून याकडे दुर्लक्ष केले जाते.
प्रेयसीची हत्या करून त्याच दिवशी दुसऱ्या मुलीशी केले लग्न; दिल्लीमध्ये पुन्हा एकदा हत्याकांड
भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवण्यासाठी क्रिकेटर्स कशा पद्धतीने निवड समितीला खूश ठेवतात याबाबत चेतन शर्मा ( Chetan Sharma) यांनी महत्त्वाचे खुलासे केले आहेत. एका वृत्तसंस्थेच्या स्टिंग ऑपरेशन मधून ही माहिती मिळवण्यात आली आहे.
उर्फी जावेदने हटके स्टाईलमध्ये चाहत्यांना दिल्या व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा, म्हणाली…
टीम इंडियाचा माजी कर्णर्धार विराट कोहली आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरभ गांगुली यांच्यातील वादावर देखील चेतन शर्मा यांनी भाष्य केले आहे. सौरभ गांगुली यांच्यामुळेच विराट कोहलीला कर्णधारपद सोडावं लागलं, असे चेतन शर्मा यांनी सांगितले आहे.
अशी झाली प्रार्थना बेहेरे आहे अभिषेकची भेट; वाचा प्रार्थनाची लव स्टोरी