![Indian Postal Department](https://www.elokhit.com/wp-content/uploads/2025/02/Indian-Postal-Department-1024x576.jpg)
Indian Postal Department । सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी भारतीय डाक विभागाने आनंदाची बातमी दिली आहे. भारतीय डाक विभागाने ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरती मोहिमेद्वारे एकूण 21,413 पदांची नियुक्ती केली जाणार आहे, ज्यामध्ये पोस्टमास्टर (BPM), सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (ABPM) आणि डाक सेवक यांचा समावेश आहे.
अर्ज प्रक्रिया अधिकृत वेबसाइटवर सुरू झाली असून, इच्छुक आणि पात्र उमेदवार 3 मार्च 2025 पूर्वी अर्ज करू शकतात. उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट देऊन आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा.
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा: ग्रामीण डाक सेवक (GDS) पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी दहावीची परीक्षा गणित आणि इंग्रजी विषयांसह उत्तीर्ण केलेली असावी. उच्च शिक्षण घेतलेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात, परंतु त्यांना शैक्षणिक कागदपत्रांमध्ये कोणतीही त्रुटी राहता कामा नये. उमेदवारांचे वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे.
पगार:
BPM पदासाठी: ₹12,000 ते ₹29,380 प्रति महिना
ABPM/डाक सेवक पदासाठी: ₹10,000 ते ₹24,470 प्रति महिना
अर्ज शुल्क: सर्व श्रेणीतील उमेदवारांसाठी 100 रुपये अर्ज शुल्क आहे. महिला उमेदवार, अनुसूचित जाती/जमाती, अपंग आणि ट्रान्सवुमन अर्जदारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे. इतर उमेदवार क्रेडिट/डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI द्वारे ऑनलाइन पेमेंट करू शकतात.