Asian Champions Trophy Semi Final । तामिळनाडू : एशियन चॅम्पियन ट्रॉफीमध्ये (Asian Champions Trophy) टीम इंडियाने (Team India) पाकिस्तानचा दारुण पराभव केला होता. या विजयासह टीम इंडियाने सेमी फायनलमध्ये पोहोचली आहे. आज टीम इंडिया आणि जपानमध्ये सेमी फायनल होणार आहे. त्यामुळे या सामन्यांमध्ये कोणता संघ फायनलमध्ये पोहोचणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Latest Marathi News)
या सामन्याला चेन्नईमधील मेयर राधाकृष्णन स्टेडियममध्ये (Mayor Radhakrishnan Stadium) रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. दरम्यान, हे दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. यापूर्वी झालेल्या सामन्यात जपानने टीम इंडियाला 1 पेक्षा जास्त गोल करण्यापासून रोखले होते. त्यामुळे आता फायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडिया कशी जपानला कशी हरवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (Team India vs Japan)
Bigg Boss OTT 2 विजेत्याला मिळणार तब्बल ‘इतके’ लाख रुपये बक्षीस; वाचून बसेल धक्का
दरम्यान, आतापर्यंत टीम इंडियाला 4 वेळा एशियन गेम्स फायनलपर्यंत मजल मारता आली आहे. त्यामुळे जर आता जपानचा पराभव झाला तर टीम इंडिया पाचव्यांदा फायनलमध्ये पोहोचेल. टीम इंडियाला 4 पैकी 3 वेळा अंतिम सामन्यात विजय मिळवता आला. टीम इंडिया पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.
Agricultural News । दुष्काळ जाहीर करून आर्थिक भरपाई देण्यात यावी, शेतकऱ्यांची मागणी