मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली MG मोटर्सची इलेक्ट्रिक कार लवकरच भारतात लॉन्च होणार आहे. या कंपनीने नुकताच आपल्या इलेक्ट्रिक कार comet EV चा फोटो जाहीर केला आहे. टाटा नॅनो पेक्षा ही कार लहान असून हिची लांबी 2.9 मीटर इतकी आहे. विशेष म्हणजे या कारची किंमत 10 लाखांच्या आसपास असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
“…तर शिंदे सरकार कोसळणार”, घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांच मोठ वक्तव्य
सुप्रसिद्ध MG कॉमेट इलेक्ट्रिक कार कंपनीने ही इलेक्ट्रिक कार त्यांच्या नवीन ग्लोबल स्मॉल इलेक्ट्रिक व्हेइकल्स प्लॅटफॉर्मवर डिझाइन केली आहे. ही कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक कार असून याची लांबी कमी आणि बॉक्सी आहे. ही कार भारतीय बाजारपेठेमध्ये Tata Tiago EV आणि Citroën E C3 यांच्याशी स्पर्धा करेल.
“आयुष्यात एक काळ असा होता की मी रस्त्यावर…”, नागराज मंजुळेंनी सांगितला ‘तो’ प्रसंग
या कारची वैशिष्ट्ये म्हणजे याच्या पुढील बाजूस ड्युअल, वर्टिकल स्टॅक केलेले हेडलॅम्प व इंटिग्रेटेड टर्न इंडिकेटरसह एलईडी डेटाइम रनिंग लॅम्प आहेत. तसेच या कारला ड्युअल-टोन फ्रंट बंपर मिळतात. या कारच्या विंडस्क्रीनच्या खाली एक क्रोम पट्टी व एक एलईडी लाइट बार आहे.
MG मोटर्स च्या कॉमेट EV या इलेक्ट्रिक कारला बॅटरी पॅक पर्याय मिळणार आहेत. यामध्ये एंट्री-लेव्हल व्हेरियंटमध्ये 17.3kWh बॅटरी पॅक मिळण्याची अपेक्षा असून हाय-एंड प्रकारात 26.7kWh बॅटरी पॅक मिळू शकतो. यांना अनुक्रमे 200kms आणि 300kms ची अंदाजे रेंज मिळणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.