महिला भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंना देखील आजकाल चांगलीच प्रसिद्धी भेटत आहे. भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधना ( Smriti Mandhana) हिचे देखील जगभरात चाहते आहेत. अनेक तरुणांची ती क्रश आहे. दरम्यान स्मृतीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने तिच्या क्रशबद्दल सांगितले आहे.
धनुष महिन्याला कमावतो ‘इतके’ कोटी रुपये, वाचा त्याच्या संपत्तीविषयी सविस्तर माहिती
हा व्हिडीओ एका मुलाखतीचा व्हिडीओ असून यामध्ये स्मृतीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. यामध्ये तिने तिच्या क्रशबद्दल अगदी उघड उघड माहिती दिली आहे. Amazon prime वर स्मृतीला काही रॅपिड फायर प्रश्न विचारले गेले.
जिओचे हे ‘स्वस्त आणि मस्त’ रिचार्ज प्लॅन तुम्हाला माहीतच असायला हवेत; वाचा सविस्तर
यावेळी तिला विचारण्यात आले की, तिचा सेलिब्रिटी क्रश कोण आहे? त्यावेळी स्मृतीनी एकही सेकंद न घेता बॉलिवूडचा सुपर हिरो हृतिक रोशनचे (Hrutik Roshan) नाव घेतले! अभिनेता हृतिक रोशन स्मृतीचा सेलिब्रिटी क्रश आहे. स्मृतीला त्याची स्टाईल प्रचंड आवडते.
याशिवाय स्मृतीला असेदेखील विचारण्यात आले की, तू क्रिकेटर नसती तर काय केले असते? तेव्हा स्मृती म्हणाली की, मी क्रिकेटर झाले नसते तर शेफ झाले असते. आपल्याला स्वयंपाक बनवायची फार आवड असल्याची कबुली देखील तिने यावेळी दिली.
राखी सावंतने केला धक्कदायक खुलासा; म्हणाली, “आदिल खान बायसेक्शुअल, त्याचा न्यूड व्हिडीओ…” पाहा VIDEO