लोकांचे आवडते कलाकार एकामागोमाग एक लग्न बंधनात अडकत आहेत. आथिया शेट्टी व के राहुल यांचा लग्न सोहळा देखील नुकताच थाटामाटात पार पडला आहे. दरम्यान ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेतील अभिनेता सुद्धा बोहल्यावर चढला आहे. ऋतुराज फडके या छोट्या पडद्यावरील अभिनेत्याने लग्नगाठ बांधत आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे.
ब्रेकिंग! पोलिसांची बोट भरसमुद्रात बुडाली
ऋतुराज फडकेने (Hruturaj Fadke) प्रजासत्ताक दिनी सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांना साखरपुड्याबाबत माहिती दिली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याच्या लग्नाचे फोटो देखील शेअर करण्यात आले आहेत. ऋतुराज फडके याच्या पत्नीचे नाव प्रीती असे आहे.
“…तर पवार साहेब एक दिवस अजित पवारांना पक्षात ठेवणार नाहीत”
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम निमिष कुलकर्णी याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंट वरून ऋतुराज व प्रीतीच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. यामुळेच सर्वांना ऋतुराज व प्रीतीच्या लग्नाबद्दल माहिती मिळाली. काल (ता.27) ला हे दोघेही लग्नबंधनात अडकले आहेत.
झी मराठी वरील ‘मन उडू उडू झालं’ (Man Udu Udu zal) या मालिकेत ऋतुराजने इंद्राची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे त्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रसिद्धी व प्रेम दिले. मध्यंतरी त्याने ‘झोलझाल’ या मराठी सिनेमामध्ये काम देखील केले होते.
वनपथकाने चांगलीच जिरवली धिंगाणा घालणाऱ्या पर्यटकांची मस्ती; 5 हजारांचा दंडही केला वसूल