सध्या डासांमुळे होणाऱ्या मलेरिया आणि व्हायरल फ्लूची साथ सुरू आहे. दरम्यान इतर आजारांपेक्षा मलेरिया खूप धोकादायक आहे. मलेरिया हा संक्रमित मच्छर चावल्याने होतो. हा मच्छर चावल्याने तुमच्या शरीरात विषाणूाच शिरकाव होतो.त्यानंतर हा विषाणू तुमच्या शरीरातील रक्ताच्या पेशींवर हल्ला करण्यास सुरुवात करतो.
मलेरियाची लागण झालेल्या व्यक्तीला ताप, थकवा येतो आणि हुडहुडीही भरते. महत्वाची बाब म्हणजे या आजारावर वेळीच योग्य उपचार न केल्यास रुग्ण दगावण्याचाही धोका असतो. मलेरिया झालेल्या रुग्णाला ताप, घाम येणे, अंगदुखी, उलट्या, डोकेदुखी, थकवा, ओटीपोटात दुखणे, अतिसार, अशक्तपणा, स्नायू दुखणे, विष्ठेमधून रक्त येणे ही लक्षणे दिसून येतात.
अशा पद्धतीने करा वाटाणा लागवड आणि व्यवस्थापन? मिळेल भरघोस उत्पन्न
मलेरियात ‘या’ गोष्टींचं सेवन करू नका
1) थंड पाणी अजिबात पिऊ नका तसेच थंड पाण्याने अंघोळदेखील करू नका.
2) मलेरियाची लागण झालेल्या रुग्णाने आंबा, डाळिंब, लिची, अननस, संत्री किंवा लिंबू ही फळे घेऊ नयेत.
3)दही, गाजर, मुळा यांसारख्या थंड पदार्थांचे सेवन टाळा.
4)तिखट-मसाले किंवा आम्ल युक्त पदार्थ , तसेच बाहेरचे तळलेले पदार्थ खाणं टाळा.
Eknath Shinde: “जो काही निर्णय होईल तो…” , निवडणूक आयोगाच्या सुनावणीबद्दल मुख्यमंत्री शिंदेंच भाष्य
मलेरियाची लागण झाल्यास काय सेवन करावे?
1)मलेरियाच्या रुग्णाने सफरचंद , पेरू खाल्ल्यास रुग्णाला फायदा होतो.
2) खिचडी, साबुदाणा हे पौष्टिक तसेच पचायला सोपे असलेले पदार्थ खावेत.कारण याचं सेवन करणं फायदेशीर आहे.
3)तापामुळे तोंडाची चव गेल्यासारखे वाटल्यास तुम्ही लिंबू कापून त्यावर काळी मिरी पावडर किंवा रॉक सॉल्ट टाकून ते चोखू शकता.
4)पाण्यात तुळशीच्या पानांसह काळी मिरी टाकून हे पाणी उकळून गाळून प्या.याचा तुम्हाला जास्त फायदा होईल.
मलेरियापासून बचाव करण्यासाठी ‘ही’ खबरदारी घ्या
1)मलेरियापासून बचाव करण्यासाठी आपल्या घरामधील किंवा आसपासच्या डासांची पैदास रोखा.
2) यासाठी आपल्या सभोवतालच्या परिसरातील साचलेल्या पाण्यात डासांची पैदास होते. त्यामुळे घराजवळील नाले साफ करा.
3)तसेच परिसरात पाणी साचतील असे खड्डे बुजवा.
4)घराबाहेर रिकामे डबे किंवा पत्रे यामध्ये पाणी साचू देवू नका.
5)पावसाळ्यात डासांपासून संरक्षण होण्यासाठी संपूर्ण शरीर झाकणारे कपडे घाला.
6)घरामध्ये आणि घराबाहेर प्रत्येक कोपऱ्यात वेळोवेळी कीटकनाशकांची फवारणी करा.
7) घरात कुलर वापरत असाल तर काळजी घ्या. कारण कुलरच पाणी जास्त दिवस राहील तर त्यात डासांची पैदास होते.
Mahesh Babu: मोठी बातमी! सुपरस्टार महेश बाबूच्या आईचे निधन; पहाटे ४ वाजता घेतला अखेरचा श्वास