
बऱ्याचदा शेतीमधून फारसे आर्थिक उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे शेतकरी शेतीसोबत पशुपालन, कुक्कुटपालन यांसारखे जोडव्यवसाय करत असतात. परंतु, दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईची झळ आता या व्यवसायांना बसू लागली आहे. यामुळे पशुउत्पादकांच्या खर्चात वाढ होत आहे. मागील काही महिन्यांपासून दुधाळ जनावरांच्या चाऱ्याच्या ( Animal food) दरात मोठी वाढ झाली आहे. मागील 9 वर्षात पहिल्यांदाच चाऱ्याचे दर उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत.
सोयाबीन पासून गुलाबजाम बनवण्याचा अनोखा फंडा! शेतकऱ्यांनी लढवली अनोखी शक्यता
ऑगस्ट महिन्यामध्ये चाऱ्याच्या किंमती 25.54 टक्क्यांनी वाढल्या होत्या. मात्र, नोव्हेंबरपर्यंत हा आकडा वाढला आहे. सध्या चाऱ्याच्या किंमतीत 27.66 टक्क्यांवर पोहोचल्या आहेत. जनावरांच्या चाऱ्याच्या दरात सातत्यानं वाढ होत असल्यानं दुग्ध व्यवसाय करणाऱ्या पशुपालकांचा उत्पादन खर्च वाढला आहे. दुग्धोत्पादन ( Milk production) वाढावे यासाठी जनावरांना चारा दिला जातो. तसेच जनावरांच्या आरोग्यासाठीही चारा गरजेचा असतो. मात्र, गेल्या काही महिन्यांत पशुखाद्याचे दर वाढल्याने पशुत्पादकांच्या आर्थिक अडचणीत वाढ झाली आहे.
बारामती शहरात विद्यार्थी सुरक्षित आहेत का? वाढत्या गुन्हेगारीमुळे ‘एज्युकेशन हब’ ला गालबोट!
लोकसभेत देखील पशुखाद्याच्या महागाई चा मुद्दा मांडण्यात आला होता. यावेळी केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी देशात पशुखाद्याचा तुटवडा असल्याचे स्पष्ट केले. यामुळे पशुखाद्याच्या किंमती झपाट्याने वाढत आहेत. दरम्यान, देशात 11.24 टक्के हिरव्या चाऱ्याची व 23.4 टक्के कोरड्या चाऱ्याची कमतरता असल्याचा अंदाज रुपाला यांनी लोकसभेत मांडला होता. यासमस्येवर उपाय म्हणून, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाला चारा प्लस मॉडेल अंतर्गत 100 चारा-उन्मुख एफपीओ ( FPO) तयार करण्यास मान्यता दिली आहे.
7 वर्षे झाली पण बिर्याणीच भारतीयांची फेव्हरेट! स्विगीने केला मोठा खुलासा…