
परिस्थिती माणसाला मोठं करत असते. कारण, परिस्थितीचे चटके खाल्लेली माणसं कष्टातून उभी राहतात. याचे उदाहरण म्हणजे बहराइच जिल्ह्यातील कल्याणसिंह ! कल्याणसिंह ( Kalyansinh) यांनी हलाखीच्या परिस्थितीत अभ्यास करून उपजिल्हाधिकारी पद मिळवले आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कल्याणसिंह यांचे वडील जवाहरलाल मौर्य मागील काही वर्षांपासून जिल्हाधिकारी ( IAS) यांच्या गाडीसाठी ड्रायव्हर म्हणून काम करत आहेत.
बिग ब्रेकिंग! शरद पवार महाविकास आघाडीच्या महामोर्चाल राहणार उपस्थित
कल्याण सिंह यांनी यूपीपीसीएस ( UPCS) परीक्षेत 40 वी रँक प्राप्त केली आहे. यामुळे त्यांना उपजिल्हाधिकारी हे पद मिळालं आहे. अगदी लहानपणापासून जिल्हाधिकारी व्हायचं असं त्यांचं स्वप्न होत. परंतु यूपीएससी परीक्षेत फक्त 5 मार्क कमी पडल्याने त्यांना जिल्हाधिकारी होता आले नाही. परंतु, उपजिल्हाधिकारी होऊन कल्याणने यश जवळ ओढून आणले आहे. कल्याणसिंह याचे वडील आता सेवानिवृत्त होणार आहेत. मात्र त्याआधीच कल्याणसिंह अधिकारी झाल्याने त्यांचा उर अभिमानाने भरून आला आहे. “कल्याणची आई आज नाही. परंतु, आपल्या मुलाचे यश पाहण्यासाठी ती आज हवी होती.” अशी प्रतिक्रिया जवाहरलाल मौर्य यांनी आपल्या मुलाच्या यशावर दिली आहे.
दूधवाला म्हणून महिलांची लूटमार करणारी बारामतीतील टोळी जेरबंद
उपजिल्हाधिकारी होण्याअगोदर कल्याण सिंह हे सोलापुर जिल्ह्यातील एनटीपीसीमध्ये सहाय्यक व्यवस्थापक होते. त्यांच प्राथमिक शिक्षण हे बहराइचमधल्या नानपारामध्ये पूर्ण झालं आहे तसेच बहराइचच्या सेव्हन्थ डे ॲडव्हेंटिस्ट कॉलेजमधून त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेऊन बीएससीसाठी बनारस हिंदू विद्यापीठात प्रवेश घेतला. नंतरच्या काळात कल्याणसिंह यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवले आहे.
बदनामीच्या रागातून वडिल व काकांकडून मुलीची हत्या; स्वतःच्या हाताने सरण रचून जाळले