Site icon e लोकहित | Marathi News

इंस्टाग्राम रिल्स मधूम ‘असे’ कमवा पैसे! मेटा कडून नवीन प्रोग्राम जाहीर

Instagram Reels Madhoom 'Like' Earn Money! New program announced by Meta

इंस्टाग्राम हे मेटाचे सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया अँप आहे. वापरकर्त्यांना आकर्षित करण्यासाठी सतत नवनवीन अपडेट यावर येत असतात. रिल्स हा इंस्टाग्राम वरील मोठ्या प्रमाणात स्क्रोल केला जाणारा प्रकार आहे. रिल्स चा ट्रेंड आजकालच्या तरुणाई मध्ये पहायला मिळतोय. यावर रिल्स बनवणाऱ्यांची संख्या देखील भरपूर आहे. बरेच लोक रिल्स फक्त आवडीसाठी बनवतात. परंतु, रिल्स मधून भरपूर पैसा कमावता येतो.

बिग ब्रेकिंग! “तुझ्यात जीव रंगला” फेम अभिनेत्री कल्याणीचा अपघाती मृत्यू

रिल्स मधून वापरकर्त्यांना पैसे कमावता यावे यासाठी इंस्टाग्रामने Instagram Reels Play हा बोनस प्रोग्राम सुरू केला आहे. या बोनस प्रोग्राम साठी वापरकर्त्यांना इंस्टाग्राम द्वारे निमंत्रित केले जाते. यानंतर एक प्रक्रिया पार पडते. या प्रोग्राम मध्ये रिल अपलोड करण्याआधी इंस्टाग्राम वर माहिती द्यावी लागते.

सहलीवरून येणाऱ्या बसचा अपघात; 10 जण जखमी

इंस्टाग्रामच्या या प्रोग्राम साठी वापरकर्त्यांना त्यांच्या कामगिरीवर व त्यांच्या आधीच्या कन्टेन्ट वरून निवडले जाते. यासाठी इंग्रजीसह इतर भाषांतील रिल्स ला प्राधान्य भेटत असून रिल्स मध्ये स्पॉन्सर्स च्या जाहिराती दाखवल्या जातात.

मुस्लिम तरुणांनी केली हिंदू तरुणाला मारहाण! सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

इंस्टाग्रामवर रिल्स च्या माध्यमातून कमाई करण्यासाठी तुमच्याकडे जास्त प्रमाणात followers असणे आवश्यक आहे. यासाठी कमीत कमी 10 हजारच्या वर followers ची आवश्यकता आहे. हौस म्हणून रिल्स।बनवणाऱ्या लोकांसाठी हे इंस्टाग्रामने हे पैशाचे साधन तयार केले आहे.

तरुणाने लुडो गेममध्ये ६० लाख रुपये गमावले; वाचा सविस्तर

Spread the love
Exit mobile version