दिवाळीनिमित्त भारतीयांसाठी इंस्टाग्रामची खास ऑफर, रील्स बनवा अन्…; पाहा नेमकी काय आहे ऑफर?

Instagram special offer for Indians on Diwali, make reels and…; See what exactly is on offer?

सध्या लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वच लोक शॉर्ट व्हिडीओ बनवतात. मागच्या दोन वर्षांपासून कंपनीने याकडे पूर्ण लक्ष केंद्रित केले असून, यासाठी अनेक नवीन फीचर्सदेखील जोडण्यात आले आहेत. टिकटॉकशी स्पर्धा करण्यासाठी कंपनीकडून अशी पाउल उचलली जात आहेत. याकडे जास्त युजर्सने आकर्षित व्हावे यासाठी कंपनीकडून भारतीय लोकांसाठी दिवाळीच्या मुहूर्तावर ऑफर देण्यात आलीये. या ऑफरद्वारे युजर्सना (users) लाखो रुपये कमावण्याची संधी देण्यात आली आहे.

“बॉस असावा तर असा!” दिवाळीचा बोनस म्हणून कर्मचाऱ्यांना दिल्या चक्क 8 कार आणि 18 बाईक्स

मेटाने या प्लेटफॉर्मसाठी Reels Play Bonus अशी ऑफर भारतामध्ये लॉन्च केली आहे. याअंतर्गत व्हिडिओ बनवणाऱ्या युजर्सना 5000 डॉलरपर्यंत म्हणजेच सुमारे 4 लाख रुपयांचा बोनस देण्यात आली आहे. आत्तापर्यंत ही ऑफर फक्त यूएसमधील (US) लोकांसाठी होती पण आता भारतीय लोकांना देखील आता याचा लाभ घेता येणार आहे.

Rutuja Latke: अंधेरी पोटनिवडणुकीतून ऋतुजा लटकेंचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा, कारण…

पाहा नेमकी काय आहे ऑफर?

या ऑफर अंतर्गत युजर्सने रील्स बनवल्यानंतर संबंधित बोनस युजर्सच्या संख्येवर अवलंबून आहे. यामध्ये 165M पर्यंत काउंट मोजला जाणारे. बोनस मिळवण्यासाठी युजरकडे 150 पर्यंत रील्स आवश्यक असाव्यात. हा बोनस 11 नोव्हेंबर 2022 पूर्वी अॅक्टिवेट केला जाऊ शकतो. यामध्ये महत्वाची बाब म्हणजे युजर्सच्या रील्सला (Reels) 30 दिवसांत 1000 व्ह्यू मिळणे गरजेचे आहे. असे झाल्यास युजर्सला लाखोंचा बोनस मिळवण्याची संधी आहे.

BMW ने सादर केली आपली दुसरी पिढी, ‘ही’ आहेत कारची वैशिष्ट्ये

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *