दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi)यांनी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात ‘भारत जोडो यात्रा’ (Bharat jodo yatra )ही मोहिम सुरु केली आहे.या मोहीमेचा कन्याकुमारी येथून या यात्रेचा प्रारंभ केला.या यात्रेला प्रारंभ करण्यापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी (rahul gandhi) यांनी श्रीपेरुबंदर येथे जाऊन माजी पंतप्रधान आणि त्यांचे पिता राजीव गांधी यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन चापुष्पांजली वाहिली. त्यानंतर पदयात्रेचा आरंभ झाला. दरम्यान या मोहिमेवरून राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Vikhe patil)यांनी राहुल गांधी यांच्यावर जळगावात प्रसारमाध्यमांशी बोलताना निशाणा साधला आहे.
Supriya Sule: राज्याला दोन मुख्यमंत्र्यांची गरज, सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याची जोरदार चर्चा
यावेळी विखे पाटील म्हणाले की, राहुल गांधी यांनी भारत जोडो ऐवजी, काँग्रेस छोडोची चिंता केली पाहिजे.दरम्यान पुढे विखे पाटील यांनी विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर होणाऱ्या आरोपांवर देखील वक्तव्य केले आहे.विखे पाटील म्हणाले की ,“सत्ता गैल्याचं वैफल्य काही जणांना आलं आहे. त्याच वैफल्यातून राज्य सरकावर टीका केली जात आहे. त्याकडे आपण फार लक्ष देण्याची गरज नाही.
YouTube: जाहिरातीशिवाय युट्यूब व्हिडिओ पहायचेत, मग आजच करा ‘हे’ ॲप इंस्टॉल
दरम्यान मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र उपमुख्यमंत्री यांच्यावर टीका करत आहेत. दरम्यान यावर विखे पाटील म्हणाले की, “प्रत्येकाला उत्तर देण्याची गरज नाही आहे. पंतप्रधान नरेंद्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार सक्षमपणे काम करत आहे. गेल्या सरकारसारखं माझे कुटुंब तुमची जबाबदारी असे करणार नाही, कारण सरकार म्हणून आम्ही जनतेची जबाबदारी घेतली आहे. ” असा टोला देखील विखे यांनी महविकास आघाडी सरकारला मारला आहे.
आता वर्षभर टिकवता येणार फळांचा राजा हापूस आंबा, अशी आहे प्रक्रिया…