चेन्नईतील (Chennai) पल्लवरममध्ये कोंबड्याचा बळी देताना कोंबड्याऐवजी बळी देणाऱ्याचाच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घडल असं की, चेन्नईच्या पल्लवरममध्ये एका बांधकामाधीन इमारतीत (building) पुजा होती. या पुजेदरम्यान कोंबड्याचा बळी दिला जात होता. दरम्यान त्याचवेळी कोंबड्याची कुर्बानी (Sacrifice) देणारी व्यक्ती अचानक तिसऱ्या मजल्यावरून खाली कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू (death) झाला. परंतु या सर्व घटनेत कोंबडा थोडक्यात वाचला. म्हणजे कोंबड्याच नशीब चांगलच होत म्हणायचं.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला आल यश, एफआरपीची पहिली उचल 3100 रुपयाने घोषित
नेमकी घटना कशी घडली ?
चेन्नईमधील पल्लवरमच्या पोझीचलूरमध्ये 48 वर्षीय टी.लोकेश यांनी त्यांच्या बांधकामाधीन घरात पुजा ठेवली होती. या पुजेदरम्यान त्यांनी बळी देण्यासाठी एक कोंबडा आणला होता. या कोंबडीचा बळी देण्यासाठी तेथेच राहणाऱ्या राजेंद्रन नावाच्या व्यक्तीला बोलावण्यात आले होते. राजेंद्रन बळी देण्यासाठी कोंबड्याला घेऊन इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर गेला. इमारतीचे बांधकाम पूर्ण झालेले नव्हते. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
माणुसकीला काळीमा फासणारी घटना, गायीच्या तोंडात फोडला फटका; जबडाच झाला उद्ध्वस्तच
दरम्यान, त्यातच एका ठिकाणी लिफ्टसाठी राखीव जागा ठेवण्यात आली होती. जेव्हा राजेंद्रन कोंबड्याला घेऊन तिसऱ्या मजल्यावर गेला तेव्हा त्याने चुकीने लिफ्टच्या मोकळ्या जागेत पाय ठेवला आणि तो खाली पडला. दरम्यान त्यानंतर राजेंद्रन यांना त्वरीत रूग्णालयता नेण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. कोंबड्याच्या ऐवजी राजेंद्रन यांचाच बळी गेला.
‘ट्विटरवर मला पुन्हा घेशील?, ट्विटर अकाउंटवरची बंदी हटवण्यासाठी कंगनाची एलन मास्कला लाडीगोडी