अलीकडीच्या काळामध्ये लग्न, हळदी, सोळावा, साखरपुडा, वाढदिवस या कार्यक्रमांमध्ये डीजे व स्पीकरचे आयोजन केले जाते. परंतु या स्पीकरच्या आवाजावरून पुण्यामध्ये एक वेगळीच घटना घडली आहे. हळदीचा कार्यक्रम चालू असताना तिथे जाऊन स्पीकरच्या आवाजाचा त्रास होत असल्याचे ज्ञानेश्वर साळुंखे यांनी सांगितले त्यानंतर त्यांना तेथे अपमानित करून मारहाण केली त्यामुळे साळुंखे यांनी त्यांचं आयुष्य संपवले.
लग्नात घडला भयानक प्रकार, वऱ्हाडी थेट नवरीला घेऊनच पळाले; घटना वाचून बसेल धक्का
चेतन बेले यांच्या घरामध्ये हळदीचा कार्यक्रम सुरू असताना साळुंखे यांनी सांगितले की आवाज करू नका. त्याचा सर्व नागरिकांना त्रास होत आहे. यावर चेतन यांनी त्यांना अपमानित करून तिथून हाकलून दिले. व स्पीकरचा आवाज हा तसांच सुरू ठेवला. पुन्हा त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी साळुंखे गेले व आवाज कमी करा असे सांगितले. यावर साळुंखे यांना लाथाबुक्की मारहाण करण्यात आली. घरामधील लोक भांडणं सोडवण्यासाठी गेल्यानंतर त्यांना देखील मारहाण करण्यात आली.
मोठी बातमी! दहावीचा निकाल जाहीर, एका क्लीकवर पहा तुमचे मार्क
साळुंखे यांनी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केल्यामुळे चेतन बेले यांनी त्यांच्या डोक्यात कोयता मारून त्यांना जखमी केले. यावरून चेतन बेले (वय 26), देवेश ऊर्फ नन्या पवार (वय 18), यश मोहिते (वय 19), शाहरुख खान (वय 26), जय तानाजी भडकुंभे (वय 22) या सर्वांना पोलिसांनी अटक केली आहे. घडलेला हा सर्व प्रकार 28 मे ला रात्री घडला आहे.
“काहीच न मिळाल्यास ऊस तोडायला जाऊ”, पंकजा मुंडे यांचं मोठं वक्तव्य
साळुंखे यांना केलेल्या मारहाणीमुळे व अपमान सहन न झाल्यामुळे त्यांनी बंडगार्डन पुलावरून नदीपात्रामध्ये उडी मारून आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्या केल्यामुळे त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. घडलेला प्रकार हा येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत घडला असून पाच जणांना अटक केली आहे.
हातानेच गुंडाळला डांबरी रस्ता, व्हीडिओ पाहुन तुम्हीही व्हाल थक्क