राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे गेले अनेक दिवस राज्यात गोंधळ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच स्तरांतून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान बुधवार पासून सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनात ( Winter session ) खासदार अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल होत असलेल्या अवमानकारक वक्तव्यचा मुद्दा मांडला. यावेळी अमोल कोल्हेंसोबत संसदेत वेगळाच प्रकार घडला आहे.
खडकी येथे ऊस पाचट व्यवस्थापन कार्यक्रम; शेतकऱ्यांसाठी कृषि विभागाकडून मार्गदर्शन
भाजपमधील ( BJP) महत्त्वाच्या नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केले आहे. या संदर्भात संसदेने खास कायदा करावा. अशी मागणी करण्यासाठी खासदार अमोल कोल्हे ( Amol Kolhe) माईकसमोर उभे राहिले असता त्यांचा माईक बंद करण्यात आला. “छत्रपती देव नाहीत, पण देवापेक्षा कमी नाहीत. त्यांच्याबद्दल वादग्रस्ते वक्तव्य करण्याची कोणाची हिंमत होता कामा नये,” असे अमोल कोल्हे यावेळी बोलत होते.
महाराष्ट्रातील पोरांच्या स्वप्नांचा चुराडा केला – रोहित पवार
तेव्हाच पीठासीन अधिकारी राजेंद्र अग्रवाल हे पाठीमागून ‘हो गया हो गया’ म्हणाले. यानंतर त्यांनी कोल्हेंचा माईक बंद करण्यास सांगितला. राजेंद्र अग्रवाल यांनी असे म्हणताच अगदी काही सेकंदातच अमोल कोल्हेंच्या समोरील माईक बंद झाला. या प्रकारामुळे कोल्हे अतिशय संतापले असून त्यांनी “माझा आवाज दाबण्यात आला”, असे माध्यमांना सांगितले आहे. दरम्यान माझा आवाज दाबला पण शिवभक्तांच्या आवाजने तुमच्या कानठ्याळ्या बसल्याशिवाय राहणार नाहीत असा गंभीर इशारा यावेळी अमोल कोल्हे यांनी दिला आहे.
“…म्हणून तेथे भाजपची सत्ता”; गुजरात निवडणुकांच्या निकालावर शरद पवारांचे मोठे वक्तव्य