तुम्ही शेवटचे चुलीवरचे जेवण कधी खाल्ले होते? आठवत नाही ना! कारण आजकाल स्वयंपाकासाठी LPG गॅसचा वापर होतो. परंतु, घरगुती वापराच्या या गॅस सिलिंडर मुळे अनेकदा अपघात होतात. यामुळे ग्राहकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होते. पण, तुम्हाला माहित आहे का ? LPG गॅस कनेक्शनवर तुम्हाला 50 लाख रुपयांपर्यंतचा विमा मिळवता येतो. याला तुम्ही एलपीजी विमा संरक्षण म्हणू शकता.
कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडित; महावितरणचा मोठा निर्णय
गॅस सिलिंडर मुळे कुठलाही अपघात झाल्यास नुकसान भरपाईसाठी हा विमा दिला जातो. गॅसचे कनेक्शन (LPG Gas connection) मिळताच या पॉलिसीचा विमा उतरवला जातो. सिलेंडरच्या स्फोटामुळे एखाद्याचा मृत्यू झाल्यास या पॉलिसी अंतर्गत 50 लाख रुपयांपर्यंतचा विमा संरक्षण दावा केला जातो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासाठी कुठलाच मासिक प्रीमियम ( Monthly premiun for policy) भरण्याची आवश्यकता नाही.
मोठी बातमी! ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील बबिताजी’चा अपघात
विमा संरक्षण दावा करण्यासाठी खालील गोष्टी लक्षात ठेवा:
1)अपघात झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत गॅस वितरक व पोलिसांना अपघाताची माहिती द्या.
2) दावा करताना एफआयआर ची पावती आवश्यक असते.
3) ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र, शवविच्छेदन अहवाल व रुग्णालयाचे बिल दावा करताना दाखवावे लावते.
4) विमा संरक्षण मिळवण्यासाठी सिलिंडर, रेग्युलेटर, पाईप ISI मार्क केलेलेच असल्याची खात्री करून घ्या.